परमबीर सिंग तुम्ही आहात कुठे भारतात की परदेशात? सुप्रीम कोर्टाने विचारला प्रश्न

जाणून घ्या काय म्हटलं आहे सुप्रीम कोर्टाने?
परमबीर सिंग तुम्ही आहात कुठे भारतात की परदेशात? सुप्रीम कोर्टाने विचारला प्रश्न
Parambir Singh

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टाकडे अटकेपासून संरक्षण मागितलं आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने विचारले आहे की परबमीर सिंग कुठे आहेत? तुम्ही कुठे आहात ते समजेपर्यंत अटकेपासून संरक्षण वगैरे काहीही मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे.

परमबीर तपासात सहभागी झालेले नाहीत. वरिष्ठ अधिकारी असूनही ते तपासात सहभागी नसल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परमबीर सिंग कुठे आहेत ते वकील सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टाला सांगणार आहेत. जोपर्यंत वकील उत्तर देत नाहीत तोपर्यंत तुमच्या अर्जावर सुनावणी होणार नाही परमबीर सिंग हे भारतात आहेत की परदेशात? असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे.

Parambir Singh
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित

काय घडलं सुप्रीम कोर्टात?

सुप्रीम कोर्टाचे जज जे कौल असं म्हणाले की परमबीर सिंग यांनी जी याचिका दाखल केली आहे ती त्यांनी ज्याला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली आहे त्याच्यातर्फे करण्यात आली आहे. परमबीर सिंग देशात आहे की देशाबाहेर?

त्यावर अॅड. बाली म्हणाले ते उत्तर रेकॉर्डवर देता येईल.

ज्यानंतर जज कौल म्हणाले की-मी तेच विचारतो आहे की परमबीर सिंग नेमके आहेत कुठे?

अॅड. नताशा दालमिया म्हणाल्या- जी याचिका दाखल करण्यात आली आहे ती पॉवर ऑफ अटर्नी दिलेल्याने केली आहे. आम्ही त्याला विचारू शकतो की परमबीर सिंग नेमके कुठे आहेत?

यावर कौल म्हणाले की- परमबीर सिंग यांनी तपासात सहकार्य केलेलं नाही. आता त्यांना अटकेपासून संरक्षण हवं आहे. तुम्ही देशाबाहेर निघून गेला आहात असा आम्हाला संशय आहे. तो चुकीचा आहे असं आम्ही कसं समजायचं जगाच्या एका कोपऱ्यात बसाल आणि सुप्रीम कोर्ट तुम्हाला अटकेपासून संरक्षण देईल हे कसं होईल? परमबीर सिंग कुठे आहेत हे समजल्याशिवाय संरक्षण वगैरे काहीही मिळणार नाही.

सुप्रीम कोर्टाने आणखी काय म्हटलं आहे?

जगाच्या कोणत्या कोपऱ्यात परमबीर सिंग जाऊन बसले आहेत ते माहित नाही. अशात ते सुप्रीम कोर्टात अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून याचिका दाखल करत आहेत. सोमवारपर्यंत आम्हाला उत्तर मिळालं तरच या याचिकेवर सुनावणी होईल.

परमबीर सिंग
परमबीर सिंग(फाइल फोटो)

परमबीर सिंग हे गेल्या अनेक महिन्यांपासून समोर आलेले नाहीत. त्यांना चौकशी समितीसाठी तीनपेक्षा जास्त वेळा बोलवण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आणि बदली, नियुक्त्यांमध्ये ढवळाढवळ केल्याचे आरोप केले होते.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in