टेन्शन कायम! महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दिवसभरात आणखी चार रूग्ण
महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी चार रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं ओमिक्रॉनच्याबाबतीतलं टेन्शन कायम आहे. महाराष्ट्रातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या रूग्णांची संख्या आता 32 झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आठ रूग्ण आढळले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या 28 झाली होती. आता ती 20 वर पोहचली आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात आज दिवसभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आणखी चार रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं ओमिक्रॉनच्याबाबतीतलं टेन्शन कायम आहे. महाराष्ट्रातल्या ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळलेल्या रूग्णांची संख्या आता 32 झाली आहे. महाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आठ रूग्ण आढळले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या 28 झाली होती. आता ती 20 वर पोहचली आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट प्रचंड झपाट्याने पसरतो आहे-WHO प्रमुख
महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे चार रूग्ण आढळले आहेत त्यातले दोन रूग्ण उस्मानाबाद येथील, एक रूग्ण मुंबई येथील आणि एक रूग्ण बुलढाणा येथील आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 2 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे दोन्ही रुग्ण नात्याने पिता पुत्र असून उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील आहेत. 43 वर्षीय व्यक्ती परदेश दुसऱ्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आली होती मात्र त्यांचा 16 वर्षीय मुलाचा आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आला होता मात्र त्या मुलाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह मात्र ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह असल्याने विशेष काळजी घ्यावी असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मुल्ला यांनी केले आहे.