राहुल गांधींवर आरोपांचे वार, गुलाम नबी आझाद यांनी सोडली काँग्रेस; सोनिया गांधींकडे सोपवला राजीनामा
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या जम्मू काश्मीर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला असून, जाता जाता त्यांनी काँग्रेसच्या आजच्या अवस्थेसाठी नेते राहुल गांधी […]
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या जम्मू काश्मीर निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनामा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवला असून, जाता जाता त्यांनी काँग्रेसच्या आजच्या अवस्थेसाठी नेते राहुल गांधी यांच्यावर खापर फोडलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या कार्य पद्धतीवर नाराज असलेले आणि काँग्रेसमधील G23 गटाचं नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनाम्यात सोनिया गांधींचं अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे.
काँग्रेसमधील दीर्घ कारकीर्दीला उजाळा गुलाम नबी आझाद यांनी दिला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली घालवलेल्या राजकीय घटना, घडामोडींच्या आठवणीही राजीनाम्यात सांगितल्या आहेत.
काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला राहुल गांधी जबाबदार -गुलाम नबी आझाद
सध्याच्या काँग्रेसच्या अवस्थेबद्दल गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसमध्ये अशी स्थिती निर्माण झालीये की, तिथून पुन्हा परतणं अवघड झालंय. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.