ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले अडचणीत, जिल्हा परिषद कारवाई करण्याच्या तयारीत
ग्लोबल शिक्षकाचा पुरस्कार मिळवणारे सोलापूरचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी हे अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेत पी.एच.डी. करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता. परंतू या अर्जात त्रुटी असल्याचं सांगत जिल्हा शिक्षकअधिकाऱ्यांनी डिसलेंवर आरोप केले आहेत. याचसोबत जिल्हा परिषद डिसले गुरुजींवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय. रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या म्हणजेच शासकीय नोकरीवर […]
ADVERTISEMENT

ग्लोबल शिक्षकाचा पुरस्कार मिळवणारे सोलापूरचे जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी हे अडचणीत सापडले आहेत. अमेरिकेत पी.एच.डी. करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे अध्ययन रजेचा अर्ज केला होता. परंतू या अर्जात त्रुटी असल्याचं सांगत जिल्हा शिक्षकअधिकाऱ्यांनी डिसलेंवर आरोप केले आहेत. याचसोबत जिल्हा परिषद डिसले गुरुजींवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय.
रणजितसिंह डिसले हे जिल्हा परिषदेच्या म्हणजेच शासकीय नोकरीवर असल्यामुळे अध्ययनासाठी रजा मागताना जिल्हा परिषदेकडे अर्ज करणं बंधनकारक असतं. रणजितसिंह डिसलेंनी हा अर्ज केल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या पीएचडी अभ्यासातून शाळेला आणि शिक्षण विभागाला काय फायदा होणार आहे हे डिसले यांनी अर्जात नमूद केलेलं नसल्याचं जिल्हा परिषदेचं म्हणणं आहे.
इतकच नव्हे डिसले गुरुजींनी शाळेवर न जाता तीन वर्षांचा पगार उचललल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करुन डिसले गुरुजींकडून तीन वर्षांचा पगार वसूल करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.
काय आहे नेमकं प्रकरण?