गुजरातमध्ये आढळला कोरोना XE व्हेरिएंटचा रूग्ण, अत्यंत संसर्गजन्य आहे हा व्हेरिएंट
कोरनाच्या व्हायरसच्या XE व्हेरिएंटने गुजरातमध्ये धडक दिली आहे. याआधी मायानगरी मुंबईत व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळून आला होता. हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य मानला जातो आहे. त्यामुळे सरकार सर्वतोपरी काळजी घेताना दिसतं आहे. गुजरातमध्ये ज्या रूग्णाला XE व्हेरिएंटची बाधा झाली आहे तो १३ मार्चला पॉझिटिव्ह आला होता. एका आठवड्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. मात्र या रूग्णाचे सँपल […]
ADVERTISEMENT

कोरनाच्या व्हायरसच्या XE व्हेरिएंटने गुजरातमध्ये धडक दिली आहे. याआधी मायानगरी मुंबईत व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळून आला होता. हा व्हायरस मोठ्या प्रमाणावर संसर्गजन्य मानला जातो आहे. त्यामुळे सरकार सर्वतोपरी काळजी घेताना दिसतं आहे.
गुजरातमध्ये ज्या रूग्णाला XE व्हेरिएंटची बाधा झाली आहे तो १३ मार्चला पॉझिटिव्ह आला होता. एका आठवड्यानंतर त्याची प्रकृती सुधारली. मात्र या रूग्णाचे सँपल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते ज्याचा निकाल समोर आल्यानंतर या रूग्णाला XE व्हेरिएंटची बाधा झाल्याची बाब समोर आली आहे. हा व्हेरिएंट आजवरच्या व्हेरिएंटपेक्षा सर्वाधिक संसर्गजन्य आहे असं मानलं जातं आहे.
आधी असं सांगितलं जात होतं की XE व्हेरिएंट हा ओमिक्रॉन व्हेरिएंटचाच सब व्हेरिएंट आहे. आत्तापर्यंत हा व्हेरिएंट धोकादायक यादीत नाही. मात्र हे सांगितलं जातं आहे की या व्हेरिएंटमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. सध्या XE व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणं नाहीत. कुणीही घाबरून जाऊ नये असंही आवाहन सरकारने केलं आहे.
तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?