गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपने दोन मंत्र्यांची खाती का काढून घेतली?

गुजरातमध्ये २०२२ अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं असून, काँग्रेसबरोबर आम आदमी पक्षानेही गुजरातवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे.
Gujarat Assembly elections 2022 : 
ministries taken away from Rajendra Trivedi and Purnesh Modi
Gujarat Assembly elections 2022 : ministries taken away from Rajendra Trivedi and Purnesh Modi

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसही तयारीला लागल्याचं चित्र असतानाच भाजपने शनिवारी (१९ ऑगस्ट) मध्यरात्री दोन मंत्र्यांकडून खाती काढून घेतली.

गुजरातमध्ये वर्षअखेरीस (गुजरात विधानसभा निवडणूक-२०२२) होत आहे. त्यामुळे भाजपही दक्ष झाली आहे. राजकीय घडामोडी सुरू असून, गुजरात भाजपने शनिवारी रात्री मंत्रिमंडळात मोठे बदल केले. दोन मंत्र्यांकडून अनुक्रमे महसूल आणि रस्ते आणि भवन या दोन खात्यांचा पदभार काढून दुसऱ्या मंत्र्यांकडे सोपवला आहे.

गुजरातमध्ये भाजपने दोन मंत्र्यांकडून खाती का काढून घेतली?

मिळालेल्या माहितीनुसार कॅबिनेट मंत्री राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडून महसूल खातं काढून घेण्यात आलं आहे. महसूल खातं आता गृहमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. दुसरीकडे रस्ते निर्माण आणि भवन खातं पुर्णेश मोदी यांच्याकडून काढून घेत जगदीश पंचाल यांच्याकडे देण्यात आलं आहे.

Gujarat Assembly elections 2022 : 
ministries taken away from Rajendra Trivedi and Purnesh Modi
Devendra Fadnavis: ''उद्धव ठाकरेंनी माझं भाषण नीट ऐकलं नाही किंवा ते त्यांना समजलेलं नाही''
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र त्रिवेदी आणि पुर्णेश मोदी यांच्याकडून खाती काढून घेण्याचं कारण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. दोन्ही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होण्याची शक्यता असल्यानं सरकारने त्यांच्याकडून खाती काढून घेतली, असं सूत्रांनी सांगितलं. तर दुसरीकडे या मंत्र्यांकडे जास्त खाती असल्यानं त्यांच्यावरील भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

आम आदमी पक्षामुळे भाजपची सावध पावलं

दिल्लीतील सत्तेपाठोपाठ आम आदमी पक्षाने पंजाबमधील सत्ताही काबीज केली. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजकारणावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. गेल्या काही वर्षात आप कडून विविध राज्यांतील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जात आहे.

आता आम आदमी पक्ष गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असून, गेल्या काही वर्षांपासून अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये पक्ष बांधणीचं काम करताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं जाईल. त्यामुळे कोणत्याही मंत्र्यावर कसलेही आरोप होणार नाही, अशा पद्धतीनेच भाजप पावलं टाकताना दिसत आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा केजरीवाल निवडणुकीत उचलू शकतात, ज्यामुळे पक्षाला नुकसान होऊ शकतं, अशी भीती भाजपला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीला आता ४ महिन्यांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे भाजप पुर्णपणे सर्तक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील शिक्षा भोगत असलेल्या आरोपींची मुक्तता केल्यानं भाजप विरोधकांच्या निशाण्यावर आहे. त्यातच पुन्हा आरोप झाले, तर अडचणी निर्माण होण्याची भीती भाजपला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in