मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारच! रवी राणा आणि नवनीत राणांचा निर्धार

मुस्तफा शेख

आमची भूमिका स्पष्ट आहे. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी विनंती केली होती की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावी. मात्र उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. उलट हनुमान चालीसा वाचण्याला विरोध दर्शवण्यात आला. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी माझं स्वागत केलं असतं. उद्या सकाळी ९ वाजता आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

आमची भूमिका स्पष्ट आहे. हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर मी विनंती केली होती की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हनुमान चालीसा म्हणावी. मात्र उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचली नाही. उलट हनुमान चालीसा वाचण्याला विरोध दर्शवण्यात आला. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी माझं स्वागत केलं असतं. उद्या सकाळी ९ वाजता आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. कायदा, सुव्यवस्था सगळ्या गोष्टी पाळून आम्ही हनुमान चालीसा म्हणणार असं रवी राणा यांनी जाहीर केलं आहे.

राज ठाकरेंच्या भाषणाचा इफेक्ट? हनुमान चालीसा पुस्तकांच्या विक्रीत 30-40 टक्क्यांनी वाढ

बाळासाहेब ठाकरे यांचे खरे शिवसैनिक असते तर आम्हाला कधीही कुणीही हनुमान चालीसा वाचण्यापासून अडवलं नसतं. आम्हाला हनुमान चालीसा म्हणण्यापासून का अडवलं जातं आहे? मला अडवणारे खरे शिवसैनिक नाहीत. ते महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असावेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक असते तर त्यांनी आम्हाला मुळीच अडवलं नसतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp