महाराष्ट्रात मास्क मुक्तीचा निर्णय झालाय का? अजित पवारांनी थेट दिलं उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

कोरोना असेपर्यंत मास्क वापरायचाच आहे. या नियमात काही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात मास्क मुक्ती झालेली नाही. जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा सांगू. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं अजित पवार यांनी मुंबईत म्हटलं आहे. आमची कोणतीही बैठक झाली की काही वाहिन्या काहीवेळा मास्क मुक्तीचा निर्णय झाल्याचं वृत्त चालवतात. मात्र तसं काहीही ठरलेलं नाही. कोरोना आहे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना असेपर्यंत मास्क वापरायचाच आहे. या नियमात काही बदल झालेला नाही. महाराष्ट्रात मास्क मुक्ती झालेली नाही. जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा सांगू. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं अजित पवार यांनी मुंबईत म्हटलं आहे. आमची कोणतीही बैठक झाली की काही वाहिन्या काहीवेळा मास्क मुक्तीचा निर्णय झाल्याचं वृत्त चालवतात. मात्र तसं काहीही ठरलेलं नाही. कोरोना आहे तोपर्यंत मास्क वापरावाच लागणार असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची पाहणी केली. मुंबईतील धोबी घाट, नरीमन भाट जेट्टी वरळी कोळीवाडा, दादर चौपाटी दर्शन गॅलरीची आणि माहीम रेती बंदराची पाहणी केली. मुंबईतील विविध भागांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबईतील विकासकामांचा आढावा, कोरोना संसर्ग, मास्कमुक्ती, युती आघाडी, अर्थसंकल्प आणि इतर मुद्यावर अजित पवार यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळ बैठक झाली की मास्कमुक्ती (Mask) बाबत चर्चा झाल्याच्या बातम्या सुरु होतात. मात्र, जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत मास्क काढून चालणार नाही. मास्क हा लावावा लागणारचं, असं अजित पवार म्हणाले. मास्क मुक्त महाराष्ट्र होणार असेल तेव्हा सांगू. त्यानंतरच बातम्या चालवा, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार कानीकपाळी ओरडून सांगत होते मास्क लावा, ज्यांनी लावला नाही त्या सगळ्यांना झाला कोरोना

हे वाचलं का?

    follow whatsapp