Mumbai Tak /बातम्या / Holi 2023 : भांग पिताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर होईल पश्चाताप
बातम्या शहर-खबरबात

Holi 2023 : भांग पिताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर होईल पश्चाताप

Holi 2023 Bhang Side effect :देशभरात आज रंगपंचमी (Holi 2023) सण साजरा केला जात आहे. या सणात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होतोय. त्यामुळे प्रत्येकजण विविध रंगात न्हाहून निघाला आहे. या रंगासोबतच होळीला भांग देखील पिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. मात्र होळीला (Holi celebration) भांग पिल्यानंतर अनेकांची अवस्था बिकट होते. काहींचा स्वत:वरचा ताबा सुटतो. तर काही नशेच्या धुंदीत विचित्रच वागू लागतात. अशा परिस्थितीत ही भांग (Bhaang) कशी सेवन करावी व भांग चढल्यास ती कशी उतरवायची? याची माहिती आम्ही देणार आहोत. (holi 2023 bhang side effect do not make these mistake after drinking bhang thandai)

‘या’ गावात धुळवड दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणूक का काढतात?

होळीत भांग (Bhaang) पिल्यानंतर लगेच त्याचा नशा चढत नाही. साधारण अर्धा तासानंतर भांगचा नशा चढू लागला. हळूहळू हा नशा व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम करू लागतो. त्यानंतर तो मज्जासंस्थावर (नर्वस सिस्टम) परिणाम करू लागतो आणि व्यक्तीचे स्वत: वरचे नियंत्रण सुटते. अशा परिस्थितीत व्यक्ती हसत असेल तर तो हसतच राहतो आणि रडत असेल तर तो रडतच राहतो. तसेच जेवत असेल तर तो व्यक्ती जेवतच जातो. म्हणजे भांग पिल्यावर माणूस जे करत असतो,ते तो दिवसभर करतो.

ज्या व्यक्तींनी भांग कधीच प्यायली नसेल, आणि त्यांनी जर प्यायली तर त्याची अवस्था बिकट होते. त्यामुळे भांग (Bhaang) पिल्यानंतर ती चढू नये यासाठी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? तसेच भांग जर चढली तर ती कशी उतरवायची असते, याची माहीती खाली दिली गेली आहे.

भांग पिताना ‘या’ चुका टाळा

  • रिकाम्या पोटी भांग (Bhaang) पिण्याची चुक करू नका किंवा थेट पिऊ देखील नका. दुधासोबत किंवा थंडाईसोबत सेवन करा. जेणेकरून ते प्यायल्यानंतर तुम्ही नियंत्रणात राहाल.

  • भांग (Bhaang) पिल्यानंतर दारूचे सेवन टाळा, नाहीतर तुम्हाला मोठं नुकसान सहन करावा लागणार आहे.

  • भांग पिल्यानंतर गाडी चालवण्याची चुक करू नका. नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.

  • भांग (Bhaang) पिल्यानंतर गोड खाऊ नका त्यामुळे भांग चढते. त्यामुळे गोड खाण टाळलं पाहिजे.

  • ठंडाई पिल्यानंतर कोणत्याही गोळ्याचे सेवन करू नका, जर केल्यास रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

Holi 2023 : होलिका दहन करण्यामागची कथा काय आहे?

भांगची नशा कशी उतरवाल?

  • होळीला भांग (Bhaang) पिल्यानंतर अनेकांना चढते. त्यामुळे ही भांग कशी उतरवायची ही मोठी समस्या असते. अशा परिस्थिती आबंट फळांचे सेवन करा. जसे मोसंबी, संत्रा आणि लिंबूचा रस प्या. या फळांच्या सेवनाने नशा कमी होतो.

  • भांग उतरविण्यासाठी डोक्यावर कोमट पाणी टाकून अंघोळ करा. यामुळे व्यक्तीचे हायपर अॅनालिसीस कमी होईल आणि त्याला बरे वाटेल.

  • तुरडाळीचे पाणी सेवन केल्याने भांगचा नशा कमी होतो. तसेच तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता.

दरम्यान वरील सर्व उपाय करून तुम्ही भांग चढण्यापासून रोखू शकता. आणि भांग चढली असल्यास ती उतरवण्यासाठी वरील उपाय करू शकतात.

Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार? bageshwar dham sarkar: बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध दुसरा गुन्हा Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचा बिकनीत बोल्ड अंदाज ग्लॅमरस जग सोडून ‘या’ 10 अभिनेत्रींनी मृत्यूला कवटाळलं, गळफास घेऊन संपवलं आयुष्य!