भीषण... 30 वर्षीय मुलाने चावा घेत आईची करंगळीच तोडली!

Amravati Crime: अमरावतीत एका दारुड्या मुलाने आपल्या आईच्या हाताच चावा घेत तिची करंगळीच तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
horrible incident in amravati 30 year old boy took bite and cut off his mothers finger
horrible incident in amravati 30 year old boy took bite and cut off his mothers finger(प्रातिनिधिक फोटो)

धनंजय साबळे, अमरावती: अमरावतीमध्ये दारुड्या मुलाने आईची करंगळीला चावा घेऊन तोडल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुड्याने मुलाने आपल्या आईला एवढ्या जोरदार चावा घेतला की, ज्यामुळे महिलेची करंगळीच हातावेगळी झाली. हा धक्कादायक प्रकार शहरालगत असलेल्या नांदगाव पेठ पोलीस स्टेशनअंतर्गत तरडगाव येथे घडला आहे.

नेमकी घटना काय?

दारुड्या मुलगा पत्नी घरी येत नाही या कारणावरून घरातील भांड्यांची आदळआपट करत होता. त्यामुळे त्याला आवडण्यासाठी त्याची आई गेली असता त्याने थेट तिचा गळाच दाबण्याचा प्रयत्न केला. स्वत:ला वाचवण्यासाठी महिलेने त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला पण मुलाने हाताची करंगळी तोंडात घेऊन जोरदार चावा घेतला. हा चावा एवढा भंयकर होता की, ज्यामध्ये महिलेची करंगळी हातावेगळी झाली.

या संपूर्ण घटनेनंतर महिलेने आपला मुलगा मयूर पंडितराव खौउल (वय 30 वर्ष) याच्यविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. याबाबत गावकऱ्यांनी देखील दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध 325 व 506 कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. सध्या नांदगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

horrible incident in amravati 30 year old boy took bite and cut off his mothers finger
कोल्हापूर : जन्मदात्या आईची हत्या करुन शरीराचे अवयव खाणाऱ्या मुलाला फाशीची शिक्षा

दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दारु पिऊन उशीरा घरी परतलेल्या मुलाला घरात घेण्यास नकार दिल्यामुळे मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली नाशिकमध्ये घडली होती. आईने दार न उघडल्यामुळे संतापलेल्या मुलाने वाद घालत आईला धक्काबुक्की केली होती. ज्यात आईचं डोकं सिमेंटच्या खांबाला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला होता.

पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी रोडवरील मेरी कॉलनी येथे विमल कचरु पवार आणि प्रशांत कचरु पवार हे दोघे मायलेक राहत होते. विमल पवार यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. ज्यानंतर विमल पवार यांना पेन्शन मिळत होती. प्रशांत पवारला दारुचं व्यसन असल्याने तो नेहमी दारु पिण्यासाठी पैसे देण्यावरुन विमल यांच्याशी भांडण करायचा.

शुक्रवारी प्रशांत नेहमीप्रमाणे रात्री उशिरा दारुच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने आईला घराचे दार उघडण्यासाठी आवाज दिला. यावेळी त्याला आईने सांगितलं की, ‘तू खूप दारु पिऊन आला आहेस, मी तुला घरात घेणार नाही’. यामुळे प्रशांतला आईचा प्रचंड राग आला. काही वेळाने विमल पवार घराबाहेर येताच प्रशांतने त्यांच्याशी हुज्जत घातली.

या वादावादीत प्रशांतने आपल्या आईला लोखंडी गेटजवळील सिमेटच्या खांबावर ढकलून दिलं. ज्यात विमल यांना गंभीर दुखापत. धक्कादाय बाब म्हणजे दारुच्या नशेत असलेल्या प्रशांतला आपल्या आईला दुखापत झाली आहे याचं भानही नव्हतं.

कारण वादावादीनंतर तो थेट घरात येऊन झोपी गेला होता. सकाळी उठल्यावर आईची हालचाल होत नसल्याचं पाहून तो चांगलाच घाबरला. ज्यानंतर त्याने तात्काळ पोलीस ठाण्यात हजर होऊन सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पंचवटी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन मुलाला अटक केली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in