उत्तरकाशीत भीषण अपघात… 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली, 17 जणांचा मृत्यू
उत्तरकाशी: उत्तरकाशी येथे रविवारी (5 जून) एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. यमुनोत्रीला जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील डामटाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये मध्य प्रदेशातील 40 प्रवासी होते. या अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. डीजीपी […]
ADVERTISEMENT

उत्तरकाशी: उत्तरकाशी येथे रविवारी (5 जून) एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. यमुनोत्रीला जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील डामटाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये मध्य प्रदेशातील 40 प्रवासी होते. या अपघातात एकूण 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.
डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तरीही पोलीस आणि एसडीआरएफची टीम बचावकार्यात गुंतलेली आहे.
डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, ‘बस मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून उत्तरकाशीसाठी जात असताना हा अपघात घडला.’
अपघातानंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित सर्व प्रवाशांना यमुनोत्रीला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.