मुंबई : धक्कादायक, माहेरी गेलेल्या पत्नीवर भररस्त्यात वार करत पतीने केली हत्या

मुंबई : धक्कादायक, माहेरी गेलेल्या पत्नीवर भररस्त्यात वार करत पतीने केली हत्या

भांडणामुळे माहेरी गेलेली पत्नी बोलत नसल्यामुळे रागावलेल्या पतीचं कृत्य

पतीसोबत झालेल्या भांडणानंतर रागावून माहेरी गेलेल्या पत्नीची भररस्त्यात पतीने हत्या केली आहे. मुंबईच्या वाशीनाका, चेंबूर या परिसरात बुधवारी सकाळी १० वाजल्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. आरोपी पती अक्षय आठवलेने आपली पत्नी आकांक्षा खरटमोलवर धारदार शस्त्राने वार करत तिची हत्या केली, हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

आकांक्षा आणि अक्षय यांचं २०१९ साली लग्न झालं. दोघांचाही प्रेम विवाह झाल्यानंतरही चार महिन्यांत भांडणांना सुरुवात झाली. यानंतर आकांक्षाने आपल्या माहेरी राहण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपी अक्षय आठवलेने वारंवार आकांक्षाला भेटण्याचा प्रयत्न करुन तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतू आकांक्षा अक्षयला भेटण्यासाठी तयार नव्हती.

बुधवारी सकाळी आकांक्षा घरातून कामावर जाण्यासाठी बाहेर पडली असता आरोपी अक्षयने आकांक्षा ज्या रिक्षातून प्रवास करत होती तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. अक्षयने रिक्षा अडवून आकांक्षासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतू आपली पत्नीही तरीही दाद देत नसल्यामुळे संतापलेल्या अक्षयने जवळ असलेल्या धारदार शस्त्राच्या सहाय्याने डोक्यात, तोंडावर आणि हातावर वार केले.

महत्वाची गोष्ट म्हणजे भररस्त्यात हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in