Photos: ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये होणार IAS टीना दाबीचं रिसेप्शन, एक दिवसाचं भाडं किती?
जयपूर: IAS टीना डाबी (Tina dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. टीना आणि प्रदीप यांचे लग्न 20 एप्रिल 2022 रोजी होणार आहे आणि लग्नाचे रिसेप्शन 22 एप्रिलला होणार आहे. जयपूरमधील एका आलिशान […]
ADVERTISEMENT

जयपूर: IAS टीना डाबी (Tina dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले असून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ही माहिती समोर आल्यापासून सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. टीना आणि प्रदीप यांचे लग्न 20 एप्रिल 2022 रोजी होणार आहे आणि लग्नाचे रिसेप्शन 22 एप्रिलला होणार आहे. जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. या लक्झरी हॉटेलमध्ये काय खास आहे? आत कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? आणि एका रात्रीच्या मुक्कामाचे भाडे किती आहे? जाणून घ्या या सगळ्याबाबत सविस्तरपणे.
कोणत्या हॉटेलमध्ये होणार लग्न?
IAS टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नाचे रिसेप्शन जयपूरमधील एका आलिशान हॉटेलमध्ये होणार आहे. लग्नपत्रिकेनुसार रिसेप्शन ‘हॉटेल हॉलिडे इन’ (Hotel Holiday INN, Jaipur)येथे होणार आहे. हॉटेलच्या अधिकृत वेबसाइट ihg नुसार, हे हॉटेल जयपूरच्या रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. हॉटेल हवा महल, जंतर मंतर, अंबर फोर्ट, नाहरगड किल्ला, सिटी पॅलेस, जलमहाल आणि अल्बर्ट हॉल यासारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांच्या देखील हे हॉटेल जवळ आहे.हॉटेलमध्ये ‘या’ लक्झरी सुविधा उपलब्ध