कोल्हापुरात महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या चोराला न्यायाधीशांनीच पकडलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दीपक सूर्यवंशी, प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातल्या गारगोटी शहरात चोरीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. एका चोराला महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी करायची सवय लागली. मागच्या दीड वर्षापासून तो महिलांची अंतर्वस्त्रं चोरत होता. अनेक भागांमध्ये महिलांची अंतर्वस्त्रं चोरण्याची प्रकरणं समोर आली. मात्र याबाबत कुणी तक्रार दिली नव्हती.

अशात गारगोटी कोर्टाच्या बाजूला जी न्यायाधीशांची निवासस्थानं आहेत तिथे राहणाऱ्या एका न्यायाधीशाने या चोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांच्या बंगल्याबाहेर वाळत घालण्यात आलेली महिलांची अंतर्वस्त्रं चोरीला गेली. हे प्रकरण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यामुळे मुल्ला यांनी या घटनेबाबत पोलिसांना सांगितलं होतं. गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी चोरी होत होती. मात्र या प्रकरणी तक्रार द्यायला कुणी पुढे आलं नव्हतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोल्हापूर: 61 वर्षीय वासनांध सावकाराकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, पीडितेने दिला स्त्री अर्भकाला जन्म

त्यानंतर न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये बसवलं आणि लपून लक्ष द्यायला सांगितलं. दिवाणी न्यायालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये हे दोघेजण बसले होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास हा चोर अंतर्वस्त्रं चोरी करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला कारमध्ये लपून बसलेल्या या दोघांनी पकडलं. हे सगळं प्रकरणही सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या चोराचं नाव आहे.

ADVERTISEMENT

5 कोटी रूपये किंमतीच्या 31 अलिशान कार चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक

ADVERTISEMENT

या प्रकरणी न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर या चोराला अटक करण्यात आली आहे. न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला आणि कर्मचारी संदीप चौगुले आणि राम चांदम यांनी या चोराला पकडलं. त्याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत धाडण्यात आलं आहे. कोर्टाने पोलिसांना तक्रार दिली होती. मात्र हा चोर दरवेळी गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. त्यामुळे आमचे न्यायाधीश व्ही. बी. मुल्ला यांनी या चोराला पकडण्यासाठी युक्ती लढवली. ज्यामुळे तो पकडला गेला असं संदीप चौगुले आणि राम चांदम या दोघांनीही सांगितलं आहे.

आता या प्रकरणी या चोराची चौकशी सुरू आहे. तो हे नेमकं का करत होता, त्यामागे नेमकं काय कारण होतं याचा पोलीस शोध घेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT