महाराष्ट्रात दिवसभरात 3 हजारांहून अधिक कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह, 56 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3063 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 56 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज महाराष्ट्रात 3198 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 71 हजार 728 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 3063 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 56 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे. आज महाराष्ट्रात 3198 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 71 हजार 728 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.27 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 87 लाख 39 हजार 974 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 50 हजार 856 नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 2 लाख 45 हजार 427 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1423 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात 36 हजार 484 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 3063 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 50 हजार 856 इतकी झाली आहे.
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या
20 सप्टेंबरला म्हणजेच मागच्या सोमवारी सर्वात कमी रूग्णसंख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली होती. 2583 रूग्ण गेल्या सोमवारी दिवसभरात पॉझिटिव्ह होते. आज समोर आलेली रूग्णसंख्या यापेक्षाही कमी आहे. 2432 रूग्ण दिवसभरात पॉझिटिव्ह आहेत हे आरोग्य विभागाने म्हटलं आहे. मागच्या सात महिन्यातली ही दुसरी निचांकी संख्या आहे.
राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहं सुरू होणार
राज्यात ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळं उघडण्यासही सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विविध नियमावली ठरवून देत सरकारने या दोन्ही गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत.त्यानंतर आता बंद असलेली सिनेमागृहे आणि नाट्यगृहे यांनाही परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरूवात ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून करण्यात आली होती. दरम्यान, शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, निर्णय स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर अखेर सरकारने शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शिक्षण विभागाने यासंबंधी नियोजन केलं होतं. त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली असून, ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळांमध्ये पुन्हा एकदा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.
राज्यात मंदिरं सुरू करण्याचा निर्णय
राज्यात मंदिरं आणि सर्व धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे.