उस्मानाबाद: दर रविवारी जनता Curfew; धार्मिक स्थळे, आठवडी बाजार बंद

मुंबई तक

उस्मानाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलेलं आहे. उस्मानाबादमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार असून जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. तसचे याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश देखील काढण्यात आले आहेत. जनता कर्फ्यूच्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उस्मानाबाद: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलेलं आहे. उस्मानाबादमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार असून जिल्ह्यात दर रविवारी जनता कर्फ्यू असणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली आहे. तसचे याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश देखील काढण्यात आले आहेत.

जनता कर्फ्यूच्या दिवशी अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे, मंदिरे देखील दर रविवारी बंद राहणार आहेत. धार्मिक विधींसाठी केवळ 5 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून या ठिकाणी नो मास्क नो एन्ट्री हा नियम लागू असणार आहे.

याशिवाय उस्मानाबादमधील जिम, क्रीडांगणे, व्यायामशाळा 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील तर मोठ्या स्पर्धा घेण्यावर बंदी असणार आहे. उस्मानाबाद जिल्हयात सभा, मोर्चे, उपोषण आणि आंदोलन यांना देखील बंदी असणार असून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स हे देखील बंद राहतील. तसेच जिल्ह्यात रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असून विनाकारण रात्रीच्या प्रवासावर बंदी असणार आहे.

नाशिकमध्ये दिवसभरात १ हजार ३३० Corona रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

हे वाचलं का?

    follow whatsapp