गेल्या दीड वर्षापासून एकही कोरोना रुग्ण न सापडलेलं महाराष्ट्रातील गाव!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे

पंढरपूर: कोरोना (Corona) संसर्गामुळे संपूर्ण जग हे भीतीच्या सावटाखाली आहे. एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास तो अनेकांना बाधित करु शकतो आणि त्यामुळेच संसर्ग झपाट्याने पसरत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) याच कोरोनाच्या संसर्गाने हैराण झालेला आहे. पण पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील चिंचणी हे गाव मात्र गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुक्त आहे. नियमित स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करुन चिंचणी या गावाने अभूतपूर्व असं काम करुन दाखवलं आहे.

चिंचणी गावातील ग्रामस्थ आणि येथील स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयामुळे आणि नियमांचं काटेकोरपणे पालन केल्यानं या गावाने गेल्या दीड वर्षापसून कोरोनाला वेशीवरच रोखून धरलं आहे. ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ सरकारच्या या अभियानाला प्रतिसाद देत कोरोना नियमांचं पालन केल्याने चिंचणी या गावाला कोरोना पासून दूर ठेवण्यात यश आल्याच येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंढरपूर तालुक्यातील एक हजार लोकवस्तीचं चिंचणी हे गाव आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणग्रस्तांचे येथे पुनर्वसन करण्यात आलं होतं. तेव्हापासून या गावाने आपला चेहरामोहराच बदलून टाकला. ओसाड माळरानावर वसलेल्या या गावाने आता पंढरपूर तालुक्यात नोंद घ्यावी अशी कामगिरी केली आहे.

ADVERTISEMENT

येथील ग्रामस्थांनी फक्त कोरोनालाच रोखून गावाचं संरक्षण केलेलं नाही. तर इतर अनेक उपक्रमातून गावाचा मान वाढविला आहे. येथील गावकऱ्यांनी संपूर्ण गावात सुमारे सात हजाराहून अधिक झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे आज घडीला संपूर्ण गाव हे हिरवंगार असल्याचं आपल्याला दिसतं. एवढंच नव्हे तर त्यामुळे गावाच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे.

ADVERTISEMENT

‘कोरोना संपेपर्यंत निवडणुका घेऊ नका’, राजू शेट्टींची निवडणूक आयोगाकडे मागणी

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. तरी देखील अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक गावं ही कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. यामुळे सगळीकडे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. पण अशा परिस्थितीत चिंचणी गावाने सहजपणे कोरोनावर मात केली आहे. (in the village of Chinchani in Pandharpur taluka no corona patient has been found for the last one and a half years)

महत्त्वाची बातमी! कोरोनातून बरे झालेले रुग्ण Insurance साठी नसतील पात्र!

पंढरपूर तालुक्यात 27 पटीने वाढले कोरोना रुग्ण

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीनंतर (Pandharpur by-election) सोलापूर जिल्ह्यात कोरोना विस्फोट झाल्याचं दिसून येत आहे. आचारसंहिता लागल्यापासून आजपर्यंत रुग्णसंख्येमध्ये (Corona patients) तब्बल 27 पटीने वाढ झाली आहे.

खरं तर निवडणुकीनंतर येथील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच आता सोलापूर जिल्ह्यात वैदकीय सेवा वगळून सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी दिले आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पंढरपूरमध्ये 17 मार्च 2021 रोजी पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यादिवशी पंढरपूरमध्ये रुग्ण संख्या होती फक्त 160. मंगळवेढ्यात अवघे 27 रुग्ण होते. पण आज (9 मे) रोजी पंढरपूरमध्ये तब्बल 2802 तर मंगळवेढ्यात 2382 एवढी रुग्ण संख्या आहे. तर पंढरपूरमध्ये 86 तर मंगळवेढ्यात 67 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी पहिली तर 17 मार्च रोजी 1005 होती तीच आज 17830 एवढी झाली आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 1905 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT