ठाण्यात स्वाईन फ्लूचा उद्रेक! ६ रुग्णांचा मृत्यू, रुग्णांची संख्या २०० च्या पलिकडे

कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सहा झाली आहे.
Increase Swine flu patients in thane district
Increase Swine flu patients in thane district

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती केडीएमसीच्या अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी दिली. कल्याण डोंबिवलीत स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सहा झाली आहे. चार रुग्ण ठाणे शहरातील, तर प्रत्येकी एक कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील आहेत.

कोरोनानंतर ठाण्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर आता स्वाईन फ्लूने डोके वर काढले आहे. ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यासोबतच कल्याण-डोंबिवलीतही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना या महामारीने जगभर थैमान घातले होते.

लाखो लोक कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्युमुखी पडले होते. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आता त्यानंतर स्वाईन फ्लूचं संकट ठाणे जिल्ह्यावर आहे. स्वाईन फ्लूमुळे लोक मरण पावत असल्याने सर्वत्र त्याची भीती पसरली आहे. त्यामुळे प्रशासनाने यासंबंधी योग्य तो पाऊल उचलावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ४८ जणांना फ्लूची लागण

केडीएमसी परिसरात आतापर्यंत दोन जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला असून कल्याण पश्चिमेतील एक आणि डोंबिवलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ४८ जणांना फ्लूची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूचे २९ रुग्ण बरे झाले आहेत. यासोबतच आणखी १७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनानंतर कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे रुग्ण येऊ लागले असून, त्यामुळे नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.

ठाणे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या

मागील काही दिवसात ठाणे जिल्हा आणि परिसरात मोठ्याप्रमाणात स्वाईन फ्लूबाधित रुग्ण आढळत आहेत. ठाण्यात एकूण २०६ रुग्णांची नोंद करण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीत ४८, नवी मुंबईत २२, मिरा भाईंदरमध्ये पाच, ठाणे ग्रामीणमध्ये तीन, बदलापूरमध्ये दोन आणि अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा सामावेश आहे.

स्वाईन फ्लू म्हणजे काय आणि कसा पसरतो?

स्वाईन फ्लूश्वसननलिकेत होणारा संसर्ग आहे. इन्फ्लूएन्झा 'टाईप-A' च्या 'H1N1' विषाणूमुळे हा आजार होतो. तज्ज्ञ सांगतात, 'H1N1' विषाणू नाक, घसा आणि फुफ्फुसातील पेशींना संक्रमित करतो. स्वाईन फ्लू' ची लागण झालेल्या व्यक्तीचा खोकला, शिंक किंवा या व्यक्तीने स्पर्श केलेल्या गोष्टीच्या संपर्कात आल्याने डोळे, नाक किंवा तोंडावाटे 'स्वाईन फ्लू' पसरतो. स्वाईन फ्लूची सर्वप्रथम लागण डुकरांना झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर हा आजार प्राण्यांपासून माणसापर्यंत पोहोचला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in