भारतीय सैन्याचं क्षेपणास्त्र थेट पाकिस्तानात कोसळलं, घडल्या प्रकाराबाबत भारताने दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून भारताने आपल्या एअरस्पेसचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यावेळी पाकिस्तानकडून असा दावा करण्यात आला होता की, भारतातून एक क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये 124 किमी अंतरावर असलेल्या खानवाल जिल्ह्यात येऊन कोसळलं होतं. आता यावर भारत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र फायर झाल्याचा दावा करण्यात आला. याच प्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानात कोसळलं क्षेपणास्त्र, भारतानं दिलं उत्तर

भारत सरकारने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, 9 मार्च रोजी नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे क्षेपणास्त्र डागण्यात आले. भारत सरकारने या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, ते क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडले होते. मात्र, यामध्ये एकाही नागरिकाला जीव गमवावा लागला नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकूण या सगळ्या प्रकारावरुन जो वाद सुरु झालाय त्याला भारत सरकारने केवळ एक तांत्रिक चूक असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे एकूण या सगळ्या प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये मात्र प्रचंड खळबळ उडाली आहे. तिथल्या सरकारपासून मीडियापर्यंत सगळेच या घटनेला भारताची आक्रमकता असल्याचं म्हटलं आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, भारताला याची जबाबदारी घ्यावी लागेल. ते म्हणाले, ‘यासाठी भारताला जबाबदार धरले पाहिजे. या घटनेबाबत भारताच्या स्पष्टीकरणानंतर आम्ही आमचे पुढील पाऊल उचलू.’ दरम्यान, आता भारताने ते स्पष्टीकरण दिले आहे पण पाकिस्तानने कोणतेही उत्तर दिलेले नाही.

ADVERTISEMENT

पाकिस्तान काय म्हणणं?

ADVERTISEMENT

पाकिस्तानचे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनीही या घटनेची सविस्तर माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘संध्याकाळी 6.43 वाजता पाकिस्तानी हवाई दलाच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरने (PAF) भारताच्या हद्दीत एक हाय-स्पीड उडणारी वस्तू दिसली. त्यानुसार सुमारे सात मिनिटांनी ती वस्तू चन्नूजवळ पडली.’

पाकिस्तान हादरलं! पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोटात ३० नागरिक ठार

दरम्यान, या प्रकारबाबत भारत सरकारने तात्काळ माहिती घेतली. त्यानंतर याबाबत आता सविस्तर चौकशी होणार आहे. याच चौकशीनंतर नेमकं काय घडलं हे समोर येणार आहे. मात्र, या सगळ्यात भारतीय लष्कराचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता हे सरकारने स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT