महागाईत भर.. पेट्रोल, डिझेल, गॅसपाठोपाठ आता कडाडले भाज्यांचे दर..

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेतच. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये डिझेलनेही प्रति लिटर शंभरी गाठली आहे. आता अशात भाज्याही महाग झाल्या आहेत. कांदे, बटाटे, टोमॅटो या रोज लागणाऱ्या भाज्या तर महाग झाल्या आहेतच. शिवाय इतर भाज्याही महाग झाल्या आहेत. त्यामुळे आता खायचं काय? हा प्रश्न सामान्य माणसापुढे आ आवासून उभा आहे.

असे आहेत भाज्यांचे दर (पुणे बाजारातील दर पत्रक )

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोथींबीर- 50 रूपये जुडी

मेथी- 35 रूपये जुडी

ADVERTISEMENT

पालक-30 रूपये जुडी

ADVERTISEMENT

भेंडी-80 रूपये किलो

भोपळा-60 रूपये किलो

तोंडली-80 रूपये किलो

फुलकोबी- 80 रूपये किलो

पावटा- 100 रूपये किलो

कारली-60 रूपये किलो

वांगी-80 रूपये किलो

दुधी-60 रूपये किलो

काकडी-50 रूपये किलो

टोमॅटो- 80 रूपये किलो

कांदे- 50 रूपये किलो

बटाटे- 40 रूपये किलो

पापडी वाल- 100 रूपये किलो

ढोबळी मिरची- 70 रूपये किलो

सुरण- 60 रूपये किलो

हे दर पुण्यातल्या बाजारातले आहेत. मुंबईतही अशाच पद्धतीने थोड्या फार फरकाने भाज्यांचे दर आहेत. अन्न धान्य महाग झालं आहे, खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या आहेत. घरगुती उपयोगाचा गॅस महाग झाला आहे. पेट्रोल आणि डिझेल महागलं आहे अशात आता भाज्यांचे दरही चांगलेच महाग झाले आहेत. मागणी वाढल्याने आणि आवक घटल्याने हे दर चढे आहेत. आणखी काही दिवस हे दर असेच राहण्याची किंवा आणखी वाढण्याची चिन्हं आहेत त्यामुळे सामान्यांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

भाज्यांना घाऊक बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकरी भाज्यांना रस्त्यावर फेकून देतात.लहरी पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे भाज्यांची लागवड कमी होत आहे.त्यामुळे भाज्यांची आवक कमी होत आहे. आणि भाज्यांचे दर कडाडले आहे.भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य माणसाचा खिशाला कात्री लागून महिन्याचं बजेट बिघडत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT