पुणे पोलिसांच्या ठिकठिकाणी धाडी! दोघांना अटक, मुद्देमालासह ९२ लाख रुपये जप्त
पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी दोन सट्टेबाजांसह तब्बल ९२ लाखांची रक्कम जप्त केली आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा रस्ता पेठ) यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. […]
ADVERTISEMENT

पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी दोन सट्टेबाजांसह तब्बल ९२ लाखांची रक्कम जप्त केली आहे. काल झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
गणेश भिवराज भुतडा (वय 50, रा रस्ता पेठ) यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पेठेतील त्रिमुर्ती सोसायटीत रविवारी रात्री क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता.
छापा टाकलेल्या ठिकाणी डायरी, मोबाईल, रोख रक्कम आढळून आली. तेथे असलेल्या आरोपी गणेश भिवराज भुतडा याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अबुधाबी येथे सुरू असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि कलकत्ता नाईट रायडर्सच्या मॅचवर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याची कबुली दिली.