Pandit Nehru, Atal Bihari Vajpayee लोकशाहीतले आदर्श! सर्व पक्षांनी आत्मपरीक्षण करावं-गडकरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंडित नेहरू, अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय लोकशाहीतले आदर्श नेते आहेत असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे असाही सल्ला नितीन गडकरी यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी?

अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित नेहरू हे दोघेही भारतीय लोकशाहीतले आदर्श नेते आहेत. दोघांनी कायमच ही भूमिका घेतली लोकतांत्रिक मर्यादेचं पालन करावं. अटलजींचं योगदान हे आम्हाला कायमच प्रेरणा देत असतं आणि पंडित नेहरू यांचा भारतीय लोकशाही उभी करण्यात खूप मोठा वाटा आहे. सगळ्या पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्या पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण आज जे सत्तेत आहेत ते उद्या विरोधात बसतील आणि आज जे विरोधात आहेत ते उद्या सत्तेत बसतील. आमच्या भूमिका बदलत असतात.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नुकत्याच संपलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गोंधळ झाला होता. विरोधकांनी जो राडा केला त्यानंतर मार्शल्सही आले होते त्यावरूनही सरकारवर बऱ्याच प्रमाणत टीका झाली होती. तसंच पेगासस, शेतकरी कायदे या सगळ्यांवरून विरोधकांनी सरकारकडे चर्चेची मागणी केली होती आणि जो गोंधळ झाला त्यामुळे सभागृह वारंवार तहकूब करावं लागलं होतं. या सगळ्याबाबत मनात असलेल्या भावना नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलून दाखवल्या.

मी तर माझ्या आयुष्यातली अनेक वर्षे विरोधातच बसून काम केलं आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मर्यादांचं पालन झालंच पाहिजे असं मला कायम वाटत आलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हे लोकशाहीची दोन चाकं आहेत. एक सक्षम विरोधी पक्ष असणं हे सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे. पंडित नेहरूंनी कायमच अटल बिहारी वाजपेयींबाबत आदर बाळगला होता, अशीच भावना विरोधी पक्षाबाबत असणं गरजेचं आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र विधानसभेत मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. एक वेळ अशी होती की मी सभागृहात व्यतय आणण्याचा प्रयत्न केला होता. त्या दिवसांमध्ये मी एकदा अटलजींना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीत काम करण्याचा हा मार्ग नाही लोकांपर्यंत तुमचा संदेश पोहचणं, तुमची भूमिका कळणं जास्त महत्त्वाचं आहे. अशी आठवणही नितीन गडकरींनी सांगितली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT