Jitendra Awhad: 'उद्धव ठाकरेंचा दृष्टीकोन वाखण्याजोगा', 'त्या' निर्णयाला स्थगिती तरीही आव्हाडांकडून CMचं कौतुक

Jitendra Awhad Reaction on Tata Hospital Decision: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 100 सदनिकांच्या निर्णयाला स्थगिती दिली. याबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Jitendra Awhad: 'उद्धव ठाकरेंचा दृष्टीकोन वाखण्याजोगा', 'त्या' निर्णयाला स्थगिती तरीही आव्हाडांकडून CMचं कौतुक
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी उद्घाटन केलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्थगिती दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना चांगलाच धक्का बसला आहे. याचबाबत आता जितेंद्र आव्हाड यांनी आता अतिशय सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जाणून घेऊयात जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले:

'परळ नाक्यावर शंभर वर्षे जुनी चाळ होती. तिचा पुनर्विकास करण्याचं ठरलं आणि तिचा पुनर्विकास देखील झाला. पण तिथल्या एकाही रहिवाश्याला बेघर केलंल नाही. आर. आर. बोर्डानुसार अधिकचे घर मास्टर लिस्टमध्ये जातात आणि त्यातून विस्थापितांना तिथे अधिकची घरे देणं हा म्हाडाला अधिकार आहे.'

'यातील 192 घरं ही म्हाडाच्या हातात होती. टीव्हीवर सांगितलं जात आहे की, कोणाची तरी घरं काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या आईची शप्पथ घेतो, मी त्यातला माणूस नाही.'

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का

'माझी आईदेखील 27 दिवसांत कॅन्सरने वारली आहे. असे धंदे मी करत नाही. मी कोणाची घरं काढून घेतली नाही. जे अधिकचे गाळे वाटण्यात आले होते त्यांच्यावर म्हाडाचा अधिकार होता. ती वाटण्यात आली आहेत.'

'स्थानिक नागरिक आणि आमदार अजय चौधरी यांच्याशी मी चर्चा करुन मार्ग काढेन. उद्धव ठाकरे हे माझे नेते आहेत. मी त्यांच्या हाताखाली काम करतो, त्यांचे निर्णय मला मान्य आहेत. मी त्यांना देखील ही गोष्ट समजवून सांगेन.'

'मला आनंद आहे की, उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात. आपल्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्याने आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला जर आपला शिवसेनेचा आमदार विरोध करतोय तर त्याची मर्जी पहिली राखली पाहिजे हा त्यांच्या दृष्टीकोन मला वाटत एक नेता म्हणून वाखण्याजोगा आहे.' असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वॉर.. जाणून घ्या कारण

नेमकं प्रकरण काय?

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला ज्या 100 सदनिका (100 Flats) देण्याचा निर्णय घेतला होता आणि ज्या उपक्रमाचं उद्घाटन स्वत: शरद पवार यांनी केलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली.

टाटा कॅन्सर रुग्णालय सदनिका हे जितेंद्र आव्हाड यांचं हे ड्रिम प्रोजेक्ट मानलं जात आहे. त्यामुळे या उपक्रमाचं उद्घाटन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते केलं होतं. यावेळी त्यांनी या सदनिकांच्या चाव्या शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. पण याच निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेचे शिवडी मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल तपासून सादर करण्यात यावा असा शेरा देखील देण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झालाय – देवेंद्र फडणवीस

टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 खोल्या देण्याचा निर्णय का घेण्यात आला होता?

टाटा कॅन्सर रुग्णालयातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं उपचारासाठी येतात. अशावेळी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची मुंबईत सहजासहजी राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे अनेकदा नातेवाईकांना जवळच्या फुटपाथवर अनेक दिवस घालवावे लागतात. याच दृष्टीने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसौय होऊ नये यासाठी राज्य सरकारने त्यांना 100 खोल्या देण्याचा निर्णय घेतला होता. या सदनिका म्हाडाच्या मार्फत उभारण्यात आल्या आहेत.

16 मे 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे 100 खोल्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. तसंच या 100 सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी देखील टाटा रुग्णालयाकडेच सोपविण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in