जुन्नर: महाविकास आघाडीतला वाद शमेना, रस्त्यावरच भिडले आजी-माजी आमदार
स्मिता शिंदे, जुन्नर: पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मागील वर्षभरात मोठे वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच काल (4 जानेवारी) दुपारी एका कार्यक्रमात पुन्हा एकदा असाच एक प्रत्यय आला आहे. जुन्नरचे आजी-माजी आमदार विकासकामांच्या श्रेयासाठी थेट एकमेकाला भिडले आणि मग ग्रामस्थांनाच मोठ्या प्रयत्नानंतर अखेर त्यांच्यात समेट घडवून आणावा लागला. जुन्नरमधील […]
ADVERTISEMENT

स्मिता शिंदे, जुन्नर: पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मागील वर्षभरात मोठे वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच काल (4 जानेवारी) दुपारी एका कार्यक्रमात पुन्हा एकदा असाच एक प्रत्यय आला आहे. जुन्नरचे आजी-माजी आमदार विकासकामांच्या श्रेयासाठी थेट एकमेकाला भिडले आणि मग ग्रामस्थांनाच मोठ्या प्रयत्नानंतर अखेर त्यांच्यात समेट घडवून आणावा लागला.
जुन्नरमधील विकासकामांवर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यातच भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक उडाली असल्याचं पाहायला मिळालं.
यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते. जुन्नर तालुक्यात उंब्रज नंबर 2 या ठिकाणी रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रमात आजी-माजी आमदार एकमेकांना भिडल्याचा हा धक्कादायक प्रकार आणि त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतली बिघाडी पुन्हा एकदा चर्चेत आली.
महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांना तू-तू, मैं-मै केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे गावकर्यांची मोठी कोंडी झाली होती.