Kirit Somaiya INS Vikrant: किरीट सोमय्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant) गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत प्रकरणी (ins vikrant) गंभीर आरोप केले होते. त्यांच्या याच आरोपांनंतर काल (6 एप्रिल) रात्री उशिरा किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. माजी सैनिक बबन भोसले यांनी सोमय्यांविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी बबन भोसले यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली आणि सोमय्यांविरोधात तक्रार देण्यात आली.
संजय राऊतांनी सोमय्यांवर आरोप केलेलं नेमकं प्रकरण काय?
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांच्यावर गंभीर आरोप केला होता. किरीट सोमय्या यांनी भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या विक्रांत युद्धनौकेच्या नावाखाली निधी गोळा केला होता. 57 ते 58 कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, तो निधी राजभवनाकडे जमा केला गेलाच नाही, असं सांगत राऊतांनी सोमैय्यांच्या कंपनीत हा पैसा वापर गेलाय का? असा सवाल केला होता.