Navneet Rana: शिवसेनेला कायमच नडलेल्या नवनीत राणा आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्याच्या मुद्दा आणि त्याच दरम्यान चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरपणी आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या सध्या चर्चेत आहेत. सुरुवातीपासूनच शिवसेनेला नडणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आहेत तरी कोण याविषयी जाणून घेऊया सविस्तर…

मुंबईत जन्मलेल्या नवनीत राणांना लहानपणापासूनच मॉडेलिंगची आवड होती. बारावीनंतर त्यांनी शिक्षण सोडून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. मॉडेलिंग आणि शिक्षणादरम्यान नवनीत यांनी मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकल्या. यानंतर त्यांनी काही काळ दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही देखील आपली कारकीर्द घडवली. नवनीत राणा यांनी तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

नवनीत यांचे आई-वडील मूळचे पंजाबी वंशाचे आहेत. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते. 12वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सहा म्युझिक व्हिडिओमध्ये मॉडेल म्हणून दिसल्या होत्या. ‘दर्शन’ या कन्नड चित्रपटातून त्यांनी आपल्या फीचर फिल्म करिअरची सुरुवात केली होती. यानंतर सीनू वासंती लक्ष्मी (2004) या सिनेमांसह चेतना (2005), जगपति (2005), गुड बॉय (2005), आणि भूमा (2008) या तेलगू चित्रपटात देखील नवनीत राणा यांनी काम केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अभिनेत्री म्हणून प्रस्थापित झाल्यानंतर तिने 2011 मध्ये अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार रवी राणा यांच्याशी लग्न केले. त्यांनी 3720 जोडप्यांमध्ये सामूहिक विवाह करून हा विवाह केला होता. या लग्नाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेवही उपस्थित होते.

या लग्नानंतर नवनीत राणा यांनी राजकारणात एन्ट्री केली होती. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना जोरदार टक्कर दिली होती. पण तेव्हा त्यांना विजय मिळवता आला नव्हता.

ADVERTISEMENT

पण यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता अधिक वाढली होती आणि 2019 मध्ये त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यावेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनी शिवसेनेचे पाच टर्मचे खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

ADVERTISEMENT

नवनीत राणा, रवि राणांना अटक; ताब्यात घेताना खारमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’

दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या नॉर्थ एव्हेन्यूवरील फ्लॅटवर कोणीतरी धमकीचे पत्र टाकले आहे. संसदेत त्यांनी शिवसेनेच्या विरोधात बोलल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असं धमकीच्या पत्रात लिहिलं असल्याचं म्हटलं होतं.

त्यामुळे नवनीत राणा या वारंवार शिवसेनेला नडत असल्याचं पाहायला मिळाला आहे. आता तर नवनीत राणांना पतीसह अटक झाल्याने नवनीत राणा या शिवसेनेविरोधात अधिकच चवताळल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी नेमकं काय घडणार हे पाहणं महत्त्वां ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT