कोल्हापूर: उपजिल्हाधिकारी-सरपंचाला लाखो रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 'यासाठी' केली होती पैशाची मागणी

कोल्हापूर: उपजिल्हाधिकारी-सरपंचाला लाखो रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, 'यासाठी' केली होती पैशाची मागणी
kolhapur deputy collector sarpanch caught red handed while accepting bribe of lakhs of rupees

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर दहावा वेतन आयोग लागू करा. गल्लेलठ्ठ पगार मिळत असतानाही, लाच घेण्याची वृत्ती काही शासकीय अधिकार्‍यांनी कमी होत नाही. चक्क रविवारच्या (9 जानवेरी) सुट्टीच्या दिवशी कार्यालयात आलेल्या प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी आणि राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं.

एका स्टोन क्रशर व्यावसायिकावर कारवाई न करण्यासाठी त्यांनी फराळे गावचा सरपंच संदीप डवर याच्यामार्फत तब्बल 11 लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी साडेपाच लाख रूपये सरपंच डवर याने घेतले आणि दोघेही लाचखोर एसीबीच्या जाळयात अडकले.

या घटनेमुळं जिल्हयाच्या महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाचखोर प्रांताधिकार्‍याच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरात 9 लाखापेक्षा अधिक रोकड सापडली आहे.

राधानगरी तालुक्यातील फराळे गावात तक्रारदाराचा स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. स्टोन क्रशरची वाहतूक करणार्‍या अवजड वाहनामुळं, गावातील रस्ते खराब झाले आहेत. तसंच काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळं ग्रामपंचायतीच्यावतीनं सरपंच संदीप डवर यांनी त्या व्यावसायिकाला क्रशर व्यवसाय बंद का करू नये? अशी नोटीस बजावली होती. तर प्रांताधिकारी प्रधान यांनीही कारवाईची भीती दाखवली होती.

याच वेळी जर कारवाई टाळायची असेल, तर प्रधान यांच्यासाठी दहा लाख आणि स्वतःसाठी दर महिन्याला एक लाख रूपये मिळाले पाहिजेत, अशी मागणी सरपंच संदीप डवरनं त्या स्टोन क्रशर व्यावसायिकाकडं केली होती. त्यामुळं त्या व्यावसायिकानं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता.

दरम्यान, काल रविवार असूनही प्रांताधिकारी कसबा बावडयातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात उपस्थित होते. दुपारी दोन वाजता सरपंच डवर स्वतःच्या अलिशान कारमधून मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील राधानगरी प्रांत कार्यालयाजवळ आला. त्यापूर्वीच प्रांताधिकारी प्रधान, पैशाच्या मोहानं कार्यालयात येऊन थांबले होते.

पहिल्या टप्प्यात प्रांताधिकार्‍यांसाठी पाच लाख आणि सरपंचासाठी 50 हजार अशी साडेपाच लाख रूपयांची लाचेची रक्कम संदीप डवर यानं स्विकारली. त्याचवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी डवर आणि प्रधान यांना रंगेहाथ पकडलं.

kolhapur deputy collector  sarpanch caught red handed while accepting bribe of lakhs of rupees
पुणे : बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला PSI नेच मागितली लाखोंची लाच; रंगेहाथ अटक

प्रधान यांच्यावर कारवाई झाल्यानंतर काल दिवसभर राधानगरी तालुक्यात त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चर्चा सुरू झाली. प्रांताधिकारीसारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर लाच लुचपतची कारवाई झाल्यानं महसूल विभागातही मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, अजय चव्हाण, शरद पोरे, मयूर देसाई, नवनाथ कदम, अमर भोसले यांनी केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in