LAC: गलवानमध्ये भारतीय लष्कराची अचानक वाढली हालचाल, नेमकं काय घडणार?

मुंबई तक

लडाख: राजधानी दिल्लीत सध्या जी -20 परिषद सुरू आहे. अलीकडेच चीनी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेटही झाली. यापूर्वी जयशंकर यांनी चीनशी संबंध ‘असामान्य’ असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे बॉर्डरवर नेमकं काय घडणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (lac sudden […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

लडाख: राजधानी दिल्लीत सध्या जी -20 परिषद सुरू आहे. अलीकडेच चीनी परराष्ट्रमंत्री आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेटही झाली. यापूर्वी जयशंकर यांनी चीनशी संबंध ‘असामान्य’ असल्याचे वर्णन केले आहे. दरम्यान, भारतीय सैन्याने लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. त्यामुळे बॉर्डरवर नेमकं काय घडणार? याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. (lac sudden stir in ladakh galwan and pangong indian army in action)

लडाख येथील गलवान खोऱ्यात LAC वर तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकड्यांचे हालचाली वाढविण्यात आल्या असून सैन्यातील जवानांनी घोडे आणि खेचरे यांच्या साहाय्याने आसपासच्या भागांचे सर्वेक्षण केले आहे. या व्यतिरिक्त, पँगोंग लेकवर हाफ मॅरेथॉन सारख्या गोष्टीही सुरू आहेत.

यापूर्वी भारतीय सैन्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. ज्यामध्ये भारतीय सैन्यातील काही जवान हे पूर्व लडाखमध्ये क्रिकेट खेळताना दिसत होते. ईस्टर्न लडाख मे 2020 पासून चीन आणि भारत यांच्यातील संघर्षाचं केंद्र आहे. या संघर्षामुळे दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव देखील वाढला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp