Pune: महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारा ‘लखोबा लोखंडे’ सापडला!
पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण करणार्या अभिजीत लिमये नावाच्या तरुणाला पुणे पोलीसांच्या सायबर सेलने मुंबईतून अटक केली. लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून तो सतत आक्षेापार्ह लिखाण करत असल्याचं समोर आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र, यावेळी अभिजीत लिमयेविरुद्ध निषेध व्यक्त करत शिवसैनिकांनी थेट त्याला काळं […]
ADVERTISEMENT

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण करणार्या अभिजीत लिमये नावाच्या तरुणाला पुणे पोलीसांच्या सायबर सेलने मुंबईतून अटक केली. लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून तो सतत आक्षेापार्ह लिखाण करत असल्याचं समोर आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र, यावेळी अभिजीत लिमयेविरुद्ध निषेध व्यक्त करत शिवसैनिकांनी थेट त्याला काळं फासल्याची घटना घडली आहे.
लखोबा लोखंडे या पेजवरुन आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अभिजीत लिमये याला मुंबईतून अटक करण्यात आली. पण याप्रकरणी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने अभिजीत लिमयेला जामीन मंजूर केला. त्यामुळे अभिजीत लिमयेची तात्काळ सुटका झाली. मात्र, न्यायालयातून बाहेर पडल्यावर निषेध म्हणून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अभिजीत लिमयेच्या तोंडाला काळं फासलं.
सोशल मीडियावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर याच प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अभिजीत लिमये याला अटक केली.
दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्याने अभिजीतची सुटका झाली मात्र, याचवेळी काही कार्यकर्त्यांनी अभिजीत लिमयेच्या तोंडाला काळं फासून आपण यापुढे असं करणार नाही असं वदवून देखील घेतलं.