महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी Lockdown करावा लागणार-उद्धव ठाकरे
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे, त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावाच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसांमध्ये प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करून […]
ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे, त्यामुळे काही ठिकाणी लॉकडाऊन करावाच लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. येत्या दोन दिवसांमध्ये प्रशासनासोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यात लसीकरण वेगाने वाढवलं जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावं लागेल. नागरिकांना विनंती आहे की लसीकरण करून घ्या, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक फिरणं टाळा, मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा असंही आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर त्यांनी लसीबद्दलही भाष्य केलं. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत मी स्वतः लस घेतली आहे. आता जनतेनेही लस घ्यावी असं आवाहन मी सर्वांना करतो. उद्धव ठाकरे यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आणखी कोणी-कोणी घेतली लस?
नागपुरात आजच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत नागपुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भातली घोषणा केली. नागपूर मनपा हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत तिथेही लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार आहेत. मद्यविक्रीची दुकानं बंद असणार आहेत मात्र घरपोच मद्यविक्रीसाठीची ऑनलाईन सेवा सुरू राहणार आहे.