LPG cylinder price : महागाईचा आणखी एक दणका! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

मुंबई तक

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून, आता पुन्हा एक तडाखा बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी महागले आहेत. यापूर्वी मार्चमध्ये ५० रुपयांनी वाढ झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढ आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. पेट्रोल-डिझेलसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले असून, आता पुन्हा एक तडाखा बसला आहे. घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी महागले आहेत. यापूर्वी मार्चमध्ये ५० रुपयांनी वाढ झाली होती.

गेल्या काही महिन्यांपासून महागाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पेट्रोल-डिझेलसह अनेक वस्तूंचे भाव सातत्याने वाढ आहेत. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे दरही वाढत असून, आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे.

तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये म्हणजेच एक हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे.

याच महिन्याच्या एक तारखेला तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजीच्या दरात १०२.५० रुपयांची वाढ केली होती. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने त्याचे दर दिल्लीत २,३५५.५० रुपयांवर पोहोचलेले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp