Maharashtra SSC Result 2021: 10वीचा ऑनलाइन निकाल ‘इथे’ पाहता येणार, पाहा निकालाच्या वेबसाइट कोणत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2021 परीक्षेचा निकाल (Maharashtra board SSC result 2020) हा 16 जुलै 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने घोषित करण्यात येणार. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे यंदा दहावीची परीक्षा घेण्यात आली नाही. त्यामुळे अंतर्गंत मूल्यमापनाच्या आधारे यंदा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, हाच निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन समजणार आहे.

दहावी इयत्तेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट आणि mahresult.nic.in, result.mh-ssc.ac.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी विद्यार्थी MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट देखील जाऊ शकतात.

दरम्यान, निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र एसएससी निकाल 2021 ची लिंक अधिकृत http://result.mh-ssc.ac.in/ अॅक्टिव्हेट करण्यात येईल. बोर्डाने दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा केली असून त्यानुसार 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल जाहीर होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

SSC Result 2021: निकाल या वेबसाइटवर पाहता येणार (List of Websites for Result)

ADVERTISEMENT

  • result.mh-ssc.ac.in

  • ADVERTISEMENT

  • examresults.net

  • indiaresults.com

  • SSC Result 2021 – निकाल नेमका कसा पाहाल?

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.

    नेमका निकाल कसा पाहता येणार?

    • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन

    • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र दहावीचा निकाल 2021 या लिंकवर क्लिक करा.

    • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.

    • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.

    • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना सब्मिट हे बटण दाबावं लागणार आहे.

    • समजा, तुमचा सीट नंबर M234897 असेल आणि तुमच्या आईचे नाव मनिषा असं असेल तर तुम्ही M234897 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच MAN असं टाकावं लागेल.

    • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल काही क्षणात आपल्याला दिसेल.

    Maharashtra SSC Result 2021: मोठी बातमी… MSBSHSE 10th निकालाची तारीख जाहीर

    SMS च्या माध्यमातून समजेल आपल्याला आपला निकाल

    दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना SMSद्वारे देखील दहावीचा निकाल जाणून घेता येईल. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.

    SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC ” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT