Maharashtra cabinet Expansion : 'या' 18 जणांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान; कुणाला डच्चू?

Eknath shinde cabinet expansion : भाजप-शिंदे गटातले प्रत्येक ९ जण घेणार शपथ, अपक्ष वेटिंगवर
maharashtra cabinet expansion full list of minister
maharashtra cabinet expansion full list of minister

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार हे आता निश्चित झालं आहे. छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांना संधी देण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटातून कोण-कोण शपथ घेणार, त्या नेत्यांच्या नावावरही आता शिक्कामोर्तब झालं आहे.

राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली. तब्बल महिनाभर लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. मात्र, शपथविधीने चित्र स्पष्ट झालं असून, मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना डच्चू मिळाला आहे.

1) चंद्रकांत पाटील (भाजप)

2) राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)

3) दादा भुसे (शिंदे गट)

4) उदय सामंत (शिंदे गट)

5) गिरीश महाजन (भाजप)

6) सुरेश खाडे (भाजप)

7) तानाजी सावंत (शिंदे गट)

8) दीपक केसरकर (शिंदे गट)

9) अतुल सावे (भाजप)

maharashtra cabinet expansion full list of minister
Maharashtra cabinet expansion : "8 ते 10 जणांना मंत्रिपद मिळेल, बाकीचे एकमेकांच्या उरावर बसायला मोकळे झाले"

10) शंभूराजे देसाई (शिंदे गट)

11) मंगल प्रभात लोढा (भाजप)

12) अब्दुल सत्तार (शिंदे गट)

13) विजयकुमार गावित (भाजप)

14) गुलाबराव पाटील (शिंदे गट)

15) संजय राठोड (शिंदे गट)

16) सुधीर मुनगंटीवार (भाजप)

17) संदीपान भुमरे (शिंदे गट)

18) रवींद्र चव्हाण (भाजप)

maharashtra cabinet expansion full list of minister
Maharashtra cabinet expansion : शपथ विधी सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना संधी नाही

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट-भाजप सरकारला अनेक अपक्ष आमदारांनीही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं जाईल, अशी चर्चा होती. शिंदे गटातील बच्चू कडूंची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असंही म्हटलं जात होतं. मात्र, प्रत्यक्षात भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांना सध्या वेटिंगवर ठेवलं आहे.

maharashtra cabinet expansion full list of minister
'लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र लढणार'; देवेंद्र फडणवीसांचं युतीबद्दल मोठं विधान

शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिला 'वंचित'

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तीन महिला आमदार शिंदे गटात सहभागी झालेल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपतही महिला आमदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या महिला आमदारांना संधी दिली याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र, शपथ घेतलेल्या १८ मंत्र्यांमध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये महिला वंचित राहिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in