Maharashtra Flood : धीर सोडू नका! सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी -उद्धव ठाकरे
‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत, मात्र आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना केलं आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
ADVERTISEMENT

‘अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत, मात्र आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत’, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकांनी धीर सोडू नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना केलं आहे.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
Chiplun Flood : चिपळूण पुराचा वाद आता कोर्टात, पालिका पाठवणार तीन विभागांना नोटीस
कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीने सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला केल्या आहेत.