धक्कादायक! नांदेडमध्ये 11 वर्षांच्या मुलाकडून 10 वर्षीय मुलीवर बलात्कार

नांदेडमधल्या धक्कादायक घटनेमुळे पोलीसही चक्रावले
प्रतीकात्मक छायाचित्र
प्रतीकात्मक छायाचित्र

बलात्काराच्या मन सून्न करणाऱ्या घटनेने नांदेड हादरलं आहे. नांदेडमध्ये 11 वर्षांच्या मुलाने 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अकरा वर्षांच्या मुलाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. अल्पवयीन मुलाच्या अत्याचाराला बळी पडलेली पीडिताही अल्पवयीनच आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

सध्याच्या घडीला कोरोना संकट लक्षात घेऊन प्रसार वाढू नये म्हणून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हाती मोबाईल दिला आहे. मात्र मोबाईलवर मुलं काय बघत असतात? नक्की अभ्यासच करत असतात का? याकडे लक्ष देण्यासाठी पालकांना वेळ नाही. मोबाईलच्या अतिवापरामुळे हा प्रकार घडल्याची भीती व्यक्त होते आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र
Crime: 15 वर्षीय मुलीवर 'निर्भया'सारखा पाशवी बलात्कार, गुप्तांगातून प्रचंड रक्तस्त्राव; पीडिता ICU मध्ये

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११ वर्षांच्या या मुलाने १० वर्षांच्या मुलीला घराच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नकळत्या वयात हातात मोबाईल आला, इंटरनेट सुरू असताना काय पाहिलं गेलं? हे पालकांना ठाऊक नाही. त्यातून हा प्रकार घडल्याची भीत व्यक्त होते आहे.

प्रतीकात्मक छायाचित्र
लिव्ह-इन जोडीदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी फरार

या घटनेतील मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या शेजारीच राहतात. दोन्ही मुलं ऑनलाईन शिक्षण घेत होती त्यासाठी एकत्र येत होती असंही कळतंय. अत्याचाराच्या घटनेनंतर मुलीने त्रास होत असल्याची माहिती आपल्या घरातल्यांना दिली. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातला मुलगा आणि मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी या प्रकरणात बालरोग तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचीही मदत घेतली आहे. मुलाचं वय फक्त ११ असल्याने पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच कायदेशीर कारवाई होणार आहे. सध्या पोलिसांनी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तपाससाठी पोलीस एका तज्ज्ञ वकिलाचीही मदत घेत आहेत.

कोरोना असल्याने मुलाचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अशातच ही अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलं आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नांदेडमधली ही घटना पोलिसांनाही चक्रावून टाकणारी ठरली आहे. या घटनेमुळे आपल्या मुलांकडे आपलं नीट लक्ष आहे का? हा प्रश्न पालकांनी पुन्हा स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in