महाराष्ट्रात 16 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 261 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात 16 हजार 369 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 95.45 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 10 हजार 989 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 261 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.74 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 71 लाख 28 हजार 93 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58 लाख 63 हजार 880 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 11 लाख 35 हजार 347 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 6 हजार 494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

कोरोना लसीच्या पुरवठ्यावरुन नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्यात आज घडीला 1 लाख 61 हजार 684 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर राज्यात आज 10 हजार 989 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 58 लाख 63 हजार 880 इतकी झाली आहे.

गरजू,गरीब लोकांचं मोफत लसीकरण व्हावं यासाठी लता मंगेशकरांनी सुरू केला ‘श्रीमंगेश व्हँक्सिन फंड’

ADVERTISEMENT

आज नोंद झालेल्या एकूण 261 मृत्यूंपैकी 170 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 91 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या 400 ने वाढली आहे. हे 400 मृत्यू, पुणे-142, ठाणे-43, नाशिक-39, औरंगाबाद-24, कोल्हापूर-20, अहमदनगर-19, उस्मानाबाद-18, पालघर-16, नांदेड-13, अकोला-9, नागपूर-9, सांगली-8, सातारा-8, हिंगोली-6, रत्नागिरी-6, यवतमाळ-5, बुलढाणा-4, जालना-3, बीड-2, चंद्रपूर-2, लातूर-2, सिंधुदुर्ग-1 आणि सोलापूर-1 असे आहेत.

ADVERTISEMENT

Corona काळात महाराष्ट्राला मिळालेल्या 2 कोटी लसी जमिनीतून उगवल्या का? -फडणवीस

महाराष्ट्रात 10 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण असलेली शहरं

मुंबई 17 हजार 939

ठाणे- 16 हजार 76

पुणे – 19 हजार 275

सातारा- 11 हजार 232

कोल्हापूर- 17 हजार 822

महाराष्ट्रातल्या पाच शहरांमध्ये अद्यापही दहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT