सात महिन्यांमध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात Corona रूग्णसंख्येचा निचांक

मुंबई तक

महाराष्ट्रात सात महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रूग्णांच्या संख्येने निचांक गाठला आहे. रोज सरासरी 2800 ते 3500 या घरात येणारी संख्या आज सर्वात कमी अर्थात 2583 इतकी नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 2583 रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात दिवसभरात 28 कोरोना रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. आज महाराष्ट्रात 3836 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात सात महिन्यात पहिल्यांदाच कोरोना रूग्णांच्या संख्येने निचांक गाठला आहे. रोज सरासरी 2800 ते 3500 या घरात येणारी संख्या आज सर्वात कमी अर्थात 2583 इतकी नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 2583 रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात दिवसभरात 28 कोरोना रूग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे.

आज महाराष्ट्रात 3836 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 40 हजार 723 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.18 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 71 लाख 64 हजार 401 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 24 हजार 498 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 2 लाख 75 हजार 736 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1677 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 41 हजार 672 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2583 नवीन रूग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 24 हजार 498 झाली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या

हे वाचलं का?

    follow whatsapp