जैन इरिगेशनचे भवरलाल जैन यांच्या पोर्ट्रेटची गिनीज बुकमध्ये नोंद
मुंबई तक: जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जळगावमध्ये तयार करण्यात आलेली मोजेक पोर्ट्रेटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आले. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारलीय. गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी या […]
ADVERTISEMENT

मुंबई तक: जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या जळगावमध्ये तयार करण्यात आलेली मोजेक पोर्ट्रेटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. भवरलाल जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला या जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र त्यांच्या कुटूंबियांना देण्यात आले. जैन पाईप्सचा उपयोग करून जैन इरिगेशनचे सहकारी प्रदीप भोसले यांनी ही प्रतिकृती साकारलीय. गुरुवारी 25 फेब्रुवारी रोजी या प्रतिकृतीचं लोकार्पण करण्यात आलं.
१८ हजार चौरस फुटांवर ही प्रतिकृती साकरली असून. जैन व्हॅली परिसरातील ‘भाऊंची सृष्टी’ येथे १५० फूट लांब व १२० फूट रुंद जागेवर सुमारे १८ हजार चौरस फुटांवर मोजेक प्रकारातील ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
भवरलाल जैन यांनी ज्या पाईप्सच्या माध्यमातून शेती केली आणि त्यांच्या कारकिर्दीचा पाया रचला, त्याचाच वापर करुन ही कलाकृती साकारण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार तीन रंगाच्या पीई आणि पीव्हीसी पाईप्सचा उपयोग करून ही कलाकृती साकारण्यात आली आहे.
या पोर्ट्रेटसाठी २५ मेट्रिक टन म्हणजेच नऊ हजार नग पीई पाईप तर पाच मेट्रिक टन म्हणजेच एक हजार नग असे एकूण दहा हजार पीव्हीसी पाईप या कलाकृतीत वापरण्यात आले आहेत.