Maharashtra Weather : राज्यात हुडहुडी, 'या' जिल्ह्यांना कडाक्याची थंडी बोचणार
Maharashtra Weather : 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र्, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची परिस्थिती निर्माण होणार आहे. जाणून घ्या हवामानाचा एकूण राज्यातील अंदाज.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात कोरड्या हवामानाची परिस्थिती
राज्यातील 'या' जिल्ह्यांत हुडहुडी
Maharashtra Weather : राज्यात नोव्हेंबर महिन्यात सामान्यत: कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात तापमानात घटन होताना दिसणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 11 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र्, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची परिस्थिती निर्माण होणार आहे.
हे ही वाचा : दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला? कारच्या उडाल्या ठिकऱ्या, 5 महत्त्वाच्या अपडेट्स समोर
कोकण विभाग :
कोकण विभागतील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबईसह ठाण्यात वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच या सर्वच जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात तापमानात घट जाणवेल. याचमुळे किंचित थंडावा निर्माण होऊ शकतो, असा हवामान विभागाने अंदाज जारी केला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुण्यात हुडहुडी
मध्य महाराष्ट्रातही सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी या भागातही तापमानात घट दिसून येईल. मुख्यत्वे मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात थंडी बोचणार आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हवामान कोरडं राहिल असा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यात सरासरीपेक्षा 2-4 डिग्रीने तापमान खाली येण्याची शक्यता वर्तवली आहे.










