मालेगाव: फॅशनेबल राहणं नागरिकांना नव्हतं पसंत, छेडछाडीला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Malegaon 20 year old young girl commits suicide: गल्लीतील तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नाशिकजवळील मालेगावमध्ये घडली आहे.
मालेगाव: फॅशनेबल राहणं नागरिकांना नव्हतं पसंत, छेडछाडीला कंटाळून 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या
malegaon 20 year old young girl commits suicide after being molested(फाइल फोटो)

मालेगाव: मालेगाव शहरातील जाफरनगर भागात राहणाऱ्या आशिया मोहंमद कासीम या 20 वर्षीय तरुणीने गल्लीतील उड्डाणटप्पू युवकाच्या एकतर्फी प्रेम व छेडछाडीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून घडल्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एक युवक तरुणीस ब्लॅकमेल करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. या मुलाच्या सोबत असलेल्या काही गुंडांनी मुलीच्या घरावर हल्लाही केल्याची तक्रार नातेवाईकांनी केली आहे.

तरुणीच्या आत्महत्येनंतर पवारवाडी पोलिसांनी प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, नातेवाईकांच्या तक्रारीनंतर संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे.

शहरातील जाफर नगर भागात राहणाऱ्या आशिया आणि जाफरीन या दोन भगिनी स्वतः शिक्षित आणि समाजाच्या रूढी परंपरेव्यतिरिक्त राहणं पसंत करणाऱ्या मुली होत्या.

शहरातील एका भागात त्यांचे ब्युटीपार्लर देखील आहे. त्यांच्या या फॅशनेबल राहणीमान आणि सुंदरतेवर गल्लीतील टवाळखोर मुलांची वक्रदृष्टी पडली आणि दोघींची छेडछाड सुरू झाली.

छेडछाडीची तक्रार पोलिसांना व गल्लीतील लोकांना करण्यात आली. तुम्ही फॅशनेबल का राहता? असा उलट सवाल त्यांना करण्यात आला.

यावेळी त्यांच्या गल्लीतील लोकांनी या दोन्ही बहिणींना साथ दिली नाही. त्या दोघींना कोणीही पाठिंबा न दिल्याने त्या हतबल झाल्या. कुणीच आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यास साथ देत नाही या भावनेतून आशियाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

यावेळी आशियाची बहीण अफरीन हिने आशियाच्या आत्महत्येनंतर पत्रकार परिषद घेऊन एक सवाल विचारला आहे.

आशियाची बहीण अफरीन
आशियाची बहीण अफरीन
malegaon 20 year old young girl commits suicide after being molested
एकतर्फी प्रेमातूनच कबड्डीपटू मुलीची हत्या : मुख्य आरोपीसह चार जणांना बेड्या

'आशियाचा बळी टवाळखोर युवकांनी घेतला की, समाजातील धार्मिक पगड्याने.. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.' असं म्हणत अफरीनने रुढी-परंपरांचा बागुलबुवा करणाऱ्यांना आपल्या एकाच सवालातून सणसणीत चपराक लगावली आहे.

21 व्या शतकातही रुढी आणि परंपरा यांचा पगडा समाजावर किती घट्ट आहे हेच आपल्याला या सगळ्यातून पाहायला मिळत आहे. यामुळेच एका तरुणीला आपली सगळी स्वप्न हृदयातच ठेवून या जगाचा निरोप घ्यावा लागला आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार कोण? असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in