गोंदिया : पत्नीसह मुलाची हत्या करुन पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

तिरोडा तालुक्यातील चुरडी गावातली धक्कादायक घटना
गोंदिया : पत्नीसह मुलाची हत्या करुन पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य
(प्रातिनिधिक फोटो)

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाने पत्नीसह मुलाची हत्या करुन नंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. चुरडी गावात ही धक्कादायक घटना घडली असून ५१ वर्षीय व्यापाऱ्याचं नाव रेवचंद बिसेन असं आहे.

रेवचंद यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपली पत्नी मालती, २० वर्षीय मुलगी पौर्णिमा आणि १७ वर्षांचा मुलगा तेजसची हत्या केली.

मृत रेवचंद बिसेन हे पेशाने ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून त्यांच्या ड्रायव्हरने आज सकाळी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. यानंतर ड्रायव्हर घरी पोहचला असता बिसेन यांनी दरवाजाही उघडला नाही त्यामुळे खिडकीतून डोकावून पाहिलं असता त्याला घरात मृतदेह पडलेले दिसले.

गोंदिया : पत्नीसह मुलाची हत्या करुन पतीने गळफास घेऊन संपवलं आयुष्य
धक्कादायक! नरबळीसाठी चेन्नईवरुन चार वर्षाच्या मुलाचं अपहरण, दोन आरोपी अटकेत; बालकाची सुटका

यानंतर ड्रायव्हरने तात्काळ आजुबाजूच्या लोकांना याबद्दल माहिती देत घराचं दार तोडलं. त्यावेळी घरात रेवचंद बेसन यांच्या आईंचा अपवाद वगळता सर्व व्यक्तींचे मृतदेह दिसले. तिरोडा पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचत पंचनामा केला. प्राथमिक तपासावरुन बेसन यांनी आपल्या परिवारातील सदस्यांची हत्या करुन नंतर गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.