धक्कादायक ! वडिलांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलेवर मावस जावयाकडून अत्याचार

मुंबई तक

नाशिक शहरात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी अमरावती वरुन नाशिकला आलेल्या महिलेवर तिच्या मावस जावयाने अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित महिलेने अमरावतीत नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली, ज्यानंतर अमरावती पोलिसांनी हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला आहे. संशयित आरोपीने पीडित महिलेला साडीचोळी करण्यासाठी नाशिकमधील भारतनगर परिसरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नाशिक शहरात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांच्या अंत्यविधीसाठी अमरावती वरुन नाशिकला आलेल्या महिलेवर तिच्या मावस जावयाने अत्याचार केल्याचं समोर आलंय. पीडित महिलेने अमरावतीत नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली, ज्यानंतर अमरावती पोलिसांनी हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग केला आहे.

संशयित आरोपीने पीडित महिलेला साडीचोळी करण्यासाठी नाशिकमधील भारतनगर परिसरात नेऊन तिकडे अत्याचार केल्याचं कळतंय. नाशिकमध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. वडिलांच्या अंत्यविधीसाठी ही महिला नाशिकमध्ये आली असताना संशयित आरोपीने तिला आपल्या घरी साडीचोळीच्या बहाण्याने नेलं. यावेळी विषारी औषधाच्या बाटलीचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केले. यानंतरही पीडित महिलेला धाक दाखवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपी तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहिला. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पुणे : पतीच्या त्रासामुळे मुलीसह संपवलं होतं आयुष्य; 29 वर्षांनंतर उच्च न्यायालयात मिळाला न्याय

हे वाचलं का?

    follow whatsapp