मंदाकिनी खडसे बॉम्बे हायकोर्टाचा मोठा दिलासा, अटक झाल्यास मिळणार जामीन
माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसेंना बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटक झाल्यास 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका होऊ शकणार आहे. मात्र 17 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी मंदाकिनी खडसे यांना ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. 21 ऑक्टोबरला त्यांना विशेष कोर्टातही […]
ADVERTISEMENT

माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसेंना बॉम्बे हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना अटक झाल्यास 50 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका होऊ शकणार आहे. मात्र 17 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत दर मंगळवारी आणि शुक्रवारी मंदाकिनी खडसे यांना ईडीसमोर हजर रहावं लागणार आहे. 21 ऑक्टोबरला त्यांना विशेष कोर्टातही हजर रहावं लागणार आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी 29 ऑक्टोबरला बॉम्बे हायकोर्टात होणार आहे.
एकनाथ खडसे यांना ED ने चौकशीसाठी का बोलावलं? काय आहे कारण?
12 ऑक्टोबरला काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यासोबत कोर्टाने मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. भोसरी MIDC घोटाळ्याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांना ED ने आतापर्यंत अनेक समन्स बजावले होते. पण त्या ईडीसमोर हजर झाल्या नव्हत्या. दुसरीकडे त्याविरोधात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसें यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र 12 ऑक्टोबरला त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र आता बॉम्बे हायकोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.