“शिवसेना-संभाजी ब्रिगेडची सत्ता आणणार” : ठाकरेंच्या मागे मराठा सेवा संघाचेही पाठबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उस्मानाबाद : गणेश जाधव

उस्मानाबाद : शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर उद्धव ठाकरे यांना आता मराठा सेवा संघाचेही पाठबळ मिळणार आहे. संभाजी ब्रिगेडची मातृसंस्था असणाऱ्या मराठा सेवा संघाने आज त्यांच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेला पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मराठा सेवा संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघामध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. अर्जुन तनपुरे म्हणाले, या पुढील काळात मराठा सेवा संघाची जबाबदारी 40 वर्षांच्या आतील व शासकीय सेवेमध्ये उच्च पदस्थ असणाऱ्या मराठा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे. केवळ 30 टक्केच जुने-जाणते पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत असणार आहेत. मराठा सेवा संघाचे राज्यभर एक कोटी सभासद तर 36 वेगवेगळे कक्ष आहेत. या सर्व कक्षांमध्ये फेरबदल करण्यात येणार असून मराठा सेवा संघाचा यापुढे चेहरा तरुण असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एकनाथ खडसेंना घेरण्याची खेळी फसली?, शिंदे-फडणवीस सरकारला न्यायालयाकडून झटका

शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती :

26 ऑगस्ट रोजी मातोश्रीवर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुका समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. देशात विषमतावादी व्यवस्था निर्माण झाली आहे. संविधान धोक्यात आले आहे. त्याला सुरक्षित करायचे असेल, संरक्षण द्यायचे असेल, तर पुरोगामी संघटनांनी एकत्र यायला हवे. भविष्य काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून सर्व निवडणुकात शिवसेनेसोबत असू”, असे यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

महिला, कमिशन, संपत्ती… : आमदार अमोल मिटकरींविरुद्ध गंभीर आरोपांची माळ

ADVERTISEMENT

संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीबद्दल उद्धव ठाकरे काय म्हणाले?

‘शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोन्ही लढवय्या संघटना आहेत. आज महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता चिरडवून टाकणे, प्रादेशिक पक्ष संपवणे यालाच लोकशाही मानणारे काही लोक बेताल बोलायला आणि वागायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे. आमचा न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे, पण हा जो निकाल लागणार आहे तो केवळ शिवसेनेच्या भविष्याचाच असेल असे नाही, तर देशात लोकशाही राहिल की, बेबंदशाही राहिल हे ठरवणारा तो निकाल असेल’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT