पुण्यात लॉकडाऊन होणार का? महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात…

मुंबई तक

पुण्यात लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाचं उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात रूग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत तर लॉकडाऊनही सुरू करण्यात आला आहे. पुण्यातही रूग्णसंख्या वाढते आहे ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. अशात पुण्यात लॉकडाऊन पुन्हा सुरू होणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुण्यात लॉकडाऊन लागणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्वाचं उत्तर दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात रूग्णसंख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत तर लॉकडाऊनही सुरू करण्यात आला आहे. पुण्यातही रूग्णसंख्या वाढते आहे ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे. अशात पुण्यात लॉकडाऊन पुन्हा सुरू होणार का? या प्रश्नावर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

पुण्यात मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करणार आहोत. त्याद्वारे कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात कशी आणता येईल यावरही लक्ष देणार आहोत. लॉकडाऊनचं म्हणाल तर तूर्तास तरी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. सध्या लॉकडाऊन करण्याएवढी परिस्थिती अजून तरी आलेली नाही. स्वॅब कलेक्शन सेंटर वाढवणं, डॉक्टर्स वाढवणं या सगळ्या उपाय योजना आम्ही करतो आहोत. रूग्ण वाढत आहेत पण महापालिका म्हणून आम्ही योग्य ती खबरदारी घेतो आहे. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत आम्ही संचारबंदी सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालयंही २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. कोरोनाचे रूग्ण कमी करण्यासाठी सगळे उपाय करतो आहोत. तरीही संख्या वाढलीच तर इतरही उपाय जे आहेत ते करण्याची तरतूद आम्ही केली आहे असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

पाहा मुरलीधर मोहोळ यांनी सविस्तर मुलाखत

हे वाचलं का?

    follow whatsapp