रुग्णालयात जाणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तीन नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

माळशिरस तालुक्यातील धक्कादायक घटना
रुग्णालयात जाणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तीन नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
(प्रातिनिधिक फोटो)

माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी वेळापूर पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पंढरपूर जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीन नोव्हेंबर पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील उघडेवारी इथं ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह उघडेवाडी गावात राहते. पीडित अल्पवयीन मुलगी सरकारी दवाखान्यात जात होती. त्यावेळी वाटेत तीन नराधमांनी तिला अडवले आणि तिची छेड काढली. त्यानंतर पीडितेला बाजूला असलेल्या एका आडोशाला नेऊन त्यातील एकाने बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेली हकीकत आईला सांगितली. त्यानंतर  पीडितेच्या आईने वेळापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन जणांविरोधात विरोधात सहलैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचार प्रकरणी रविवारी गुन्हा दाखल होताच अकलूज पोलिसांनी शिताफीनेन सापळा रचून पळून जाणाऱ्या संशयित आरोपींना इंदापूरातून पकडलं. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी युवराज गोडसे, रणजीत कोळेकर व एका अनोळखी तरुण विरोधात सहलैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना सोमवार (दि.१) रोजी पंढरपूर न्यायालयात हजर केले असता तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in