NCB, ED, CBI, IT या तपास यंत्रणांचा मोदी सरकारकडून सातत्याने गैरवापर-शरद पवार
केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं आहे. NCB, CBI, ED यांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातो आहे हे सातत्याने दिसून येतं आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांंनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंग यांनी काही आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी जे […]
ADVERTISEMENT

केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं आहे. NCB, CBI, ED यांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातो आहे हे सातत्याने दिसून येतं आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंग यांनी काही आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आणि त्यातून जे वातावरण निर्माण केलं गेलं त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा लागला. एक जबाबदार अधिकारी असे बेछूट आरोप करतो असं कधी घडलं नाही. आता परमबीर सिंग कुठे आहेत? अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला. पण परमबीर सिंगांचं काय? त्यांच्यावर किती आरोप झाले असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
अनिल देशमुखांनी सत्ता सोडली मात्र परमबीर सिंग गायब झाले हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. अनिल देशमुख यांच्या घरी काल पाचव्यांदा छापा मारला. एकाच घरात पाचवेळा जाऊन काय मिळतं हे माहित नाही पण त्यांनी विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. याचा विचार नागरिकांनीही करण्याची गरज आहे.











