Molnupiravir Corona Medicine: 35 रुपयांची कॅप्सूल, 5 दिवसांचा कोर्स; कोरोना बरा करण्याऱ्या गोळीबद्दल सगळी माहिती
मुंबई: कोरोना व्हायरसविरोधात एक नवीन औषध भारतात आले आहे. काही दिवसांपूर्वी, ड्रग्स कंट्रोलरने अँटी-व्हायरल औषध Molnupiravir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. या औषधाचा वापर कोरोनाच्या उपचारात केला जाणार आहे. भारतातील 13 कंपन्या हे औषध बनवत आहेत. Molnupiravir हे औषध कोरोनाच्या उपचारात खूप प्रभावी ठरले आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यू […]
ADVERTISEMENT

मुंबई: कोरोना व्हायरसविरोधात एक नवीन औषध भारतात आले आहे. काही दिवसांपूर्वी, ड्रग्स कंट्रोलरने अँटी-व्हायरल औषध Molnupiravir च्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली होती. या औषधाचा वापर कोरोनाच्या उपचारात केला जाणार आहे. भारतातील 13 कंपन्या हे औषध बनवत आहेत.
Molnupiravir हे औषध कोरोनाच्या उपचारात खूप प्रभावी ठरले आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होईल. या औषधाचा एकच डोस 200mg असेल. त्याचा कोर्स ५ दिवसांचा असणार आहे.
या औषधाची किती असेल किंमत?
– हे औषध भारत स्ट्राइड्स फार्मा, डॉ रेड्डीज, सन फार्मा, सिप्ला, हीटेरो आणि ऑप्टिमससारख्या 13 कंपन्या बनवत आहेत. या सर्व कंपन्या त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या नावाने ते लॉन्च करत आहेत.