RIL: मुकेश अंबानींनी विकत घेतले हे आलिशान हॉटेल, एका खोलीचं भाडं तब्बल 10 लाख

Mukesh Ambani bought luxurious hotel: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने न्यूयॉर्कमधील एक आलिशान हॉटेल खरेदी केलं आहे.
RIL: मुकेश अंबानींनी विकत घेतले हे आलिशान हॉटेल, एका खोलीचं भाडं तब्बल 10 लाख
mukesh ambani bought luxurious hotel in new york charge of one room is more than 10 lakhs

न्यूयॉर्क: अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) ने शनिवारी सांगितले की त्यांनी न्यूयॉर्कमधील मँडरिन ओरिएंटल (Mandarin Oriental)हे प्रीमियम लक्झरी हॉटेल तब्बल 9.815 कोटी डॉलरमध्ये खरेदी करण्याचा करार केला आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) ने आता हळूहळू हॉटेल व्यवसायात आपला जम बसविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची कंपनी आता न्यूयॉर्कमधील प्रीमियम लक्झरी हॉटेल मँडरिन ओरिएंटल (Mandarin Oriental) विकत घेणार आहे. या हॉटेलमध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत.

हा करार सुमारे 9.81 कोटी डॉलर (सुमारे 728 कोटी रुपये) मध्ये होणार आहे. मँडरिन ओरिएंटल त्याच्या बॉलरूम, पंचतारांकित स्पा आणि जेवणाच्या क्षेत्रांसाठी ओळखले जाते. आयरिश अभिनेता लियाम नीसन आणि अमेरिकन अभिनेत्री लुसी लियू येथे नियमित पाहुण्यांपैकी आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज हे अधिग्रहण त्यांच्या एका उपकंपनीमार्फत करेल.

हॉटेलमध्ये 248 खोल्या

मँडरिन ओरिएंटल हॉटेल 2003 साली बांधण्यात आलं होतं. हे 80 कोलंबस सर्कलमध्ये स्थित आहे. जे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे. हे प्रिस्टाइन सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कल जवळ आहे. या हॉटेलमध्ये 248 खोल्या आणि स्यूइट आहेत. मँडरिन ओरिएंटल हे 54 मजल्यांचे आहे.

हे हॉटेल इतके महाग आहे की त्याच्या ORIENTAL SUITE मध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क (14000 USD) म्हणजेच 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. ही खोली 52व्या मजल्यावर आहे. तर सर्वात स्वस्त रुम 745 डॉलरला (म्हणजे सुमारे 55 हजार रुपये) आहे.

एका रुमसाठी 10 लाखांपेक्षा जास्त शुल्क

खरं तर, रिलायन्स इंडस्ट्रीजने शनिवारी स्टॉक एक्स्चेंजला माहिती दिली की, रिलायन्स इंडस्ट्रीजची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) ने कोलंबस सेंटर कॉर्पोरेशन (केमन) चे संपूर्ण जारी केलेले शेअर भांडवल ताब्यात घेण्यासाठी करार केला आहे.

केमॅन आयलंडमध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचा मँडरीन ओरिएंटलमध्ये 73.37 टक्के हिस्सा आहे. हा करार 9.81 कोटी डॉलरपेक्षा जास्त किंमतीचा असेल. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत रिलायन्सकडून प्रसिद्ध हॉटेलचे हे दुसरे अधिग्रहण आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिलायन्सने यूकेमधील स्टोक पार्क लिमिटेड हॉटेल विकत घेतलं होतं. हा करार मार्च-2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाकडे जवळपास 2.6 लाख कोटी रुपये रोख आहेत. हा रोख वापरून अंबानी या क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्याची तयारी करत आहेत. ते समूहाच्या डिजिटल आणि रिटेल व्यवसाय रिलायन्ससाठी मोठा आधारस्तंभ बनवण्याच्या तयारीत आहे. यामुळे नफ्यासाठी रिलायन्स समूहाचे पारंपारिक तेल शुद्धीकरण व्यवसायावरील अवलंबित्व कमी होईल.

हा करार मार्च 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी काही पारंपारिक नियामक आणि मान्यता घ्याव्या लागतील. कंपनीने असे म्हटले आहे की हॉटेलमधील उर्वरित 26.63 टक्के भागभांडवल RIIHL देखील विकत घेतले जातील. जर हॉटेलमध्ये भागीदारी असलेले इतर भागीदार विक्री प्रक्रियेत सामील झाले. यासाठीचे मूल्यांकन देखील केमॅन कंपनीकडून केलेल्या अधिग्रहणासारखेच असेल.

सध्या रिलायन्सची EIH Ltd मध्ये गुंतवणूक आहे. याव्यतिरिक्त, ते कन्व्हेन्शन सेंटर्स, हॉटेल्स आणि गृहनिर्माण विकसित करत आहे. मँडरिन ओरिएंटल गेल्या वर्षी 1 एप्रिल रोजी पुन्हा उघडले. तथापि, इतर मोठ्या हॉटेलांप्रमाणेच, परदेशातून व्यावसायिक सहलीसाठी येणारे अतिथी आणि ग्राहकांचीही सध्या कमतरता आहे.

mukesh ambani bought luxurious hotel in new york charge of one room is more than 10 lakhs
मुकेश अंबानी भारत सोडून कुठेही शिफ्ट होणार नाहीत, 'ते' वृत्त चुकीचं असल्याचं रिलायन्सचं स्पष्टीकरण

हॉस्पिटीलिटी व्यवसायाचा विस्तार करण्याच्या RIL च्या धोरणाचाच हा एक भाग आहे. RIL मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कन्व्हेन्शन सेंटर, हॉटेल आणि व्यवस्थापित निवासस्थान विकसित करत आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in