आजपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा, मुंबईत या ठिकाणी मिळेल तुम्हाला लस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्र सरकारच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून राबवण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील आजारी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या टप्प्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात लसीकरण राबवण्यात येणार आहे. मुंबई शहरातील जी खासगी रुग्णालयं जन आरोग्य योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा रुग्णालयांना सदर लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. महानगरपालिका किंवा शासकीय रुग्णालयात लसीकरण निशुल्क: असून खासगी रुग्णालयात प्रत्येक डोससाठी २५० रुपये भरावे लागणार आहेत.

अवश्य वाचा – लसीकरणात ‘या’ व्यक्तींना मिळणार प्राधान्य, सरकारकडून निकष जाहीर

केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनेनुसार निकषांमध्ये बसणाऱ्या ५३ रुग्णालयांची यादी महापालिकेला प्राप्त झाली आहे. या रुग्णालयात शासकीय मानांकानुसार पुरेशी जागा, मनुष्यबळ तसेच लसीकरणामुळे होणारे विपरीत परिणाम, व्यवस्थापन यासाठी सुविधा आहेत की नाही या बाबींचे सर्वेक्षण करुन लसीकरण केंद्र म्हणून निवड करण्यात येईल. आजपासून मुंबईतील महानगरपालिकेच्या या ठिकाणी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) बी.के.सी जंबो कोविड केंद्र, बांद्रा

२) मुलूंड जंबो कोविड केंद्र, मुलूंड

ADVERTISEMENT

3) नेस्को जंबो कोविड केंद्र, गोरेगाव

ADVERTISEMENT

4) सेव्हन हिल रुग्णालय, अंधेरी

5) दहिसर जंबो केंद्र, दहिसर

सध्या कार्यरत असललेल्या खाजगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात लसीकरण केवळ त्याच रुग्णालयातील आरोग्य कर्मचा-यांसाठी सुरु राहील. राज्य शासनाकडून या संदर्भात धोरण निश्चित झाल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल. यासाठीच शासनाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेतील जी खाजगी रुग्णालय जन आरोग्यविमा योजना तसेच केंद्र अथवा राज्य शासनाच्या आरोग्यविमा योजना राबवत असतील अशा खाजगी रुग्णालयात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील सहआजार असलेल्या नागरिकांचे १ मार्च २०२१ पासून लसीकरण २५० रुपयांचं शुल्क आकारुन सुरु करण्यात येईल.

खाजगी रुग्णालयांची नावे खालीलप्रमाणे :-

१) एच. जे. दोशी हिंदू सभा रुग्णालय, घाटकोपर

२) के. जे. सोमय्या वैदयकिय महाविदयालय, सायन

३) एस. आर. सी. सी. चिल्ड्रन रुग्णालय, महालक्ष्मी

लसीकरणासाठी नागरिकांनी कोविन डिजिटल मंचावर नोंदणी करणे आवश्यक असून आगाऊ नोंदणी अथवा लसीकरण केंद्रात लसीकरणापूर्वी नोंदणी करता येऊ शकेल. ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील लोकांसाठी २० आजारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. हे आजार असलेल्या नागरिकांनी नोंदणीकृत वैदयकीय सेवा देणा-या डॉक्टरांकडून घेतलेले प्रमाणपत्र लसीकरण केंद्रात दाखविणे आवश्यक आहे. ६० वर्षावरील नागरिकांनी वयाबाबतचा योग्य पूरावा (कार्यालयीन, आधारकार्ड,पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र) सादर करणे आवश्यक आहे. वरिष्ठ नागरिकांसाठी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT